Maharashtra Political Crisis Pune City Is Ncp Leaders Supports Sharad Pawar And Pimpri-Chinchwad Leaders Supoort Ajit Pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Political Crisis :  राष्ट्रवादीमध्ये (NCP)  (Maharashtra Political Crisis)अजित पवारांच्या निर्णयामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले. अजित पवारांच्या गटात जायचं की शरद पवारांच्या गटात जायचं, असा प्रश्न सध्या सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. त्यातच आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका असल्यामुळे राष्ट्रवादीसाठी आज निर्णायक दिवस असणार आहे.   शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहे याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही.  त्यामुळे नेमक्या आकड्यांचा अंदाज लावता येत नाही आहे. मात्र  पुणे शहर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठिशी तर पिंपरी-चिंचवड अजित पवारांच्या पाठिशी आहेत आणि अनेक नेते अजूनही संभ्रमात आहेत.

Maharashtra Political Crisis : पुणे शहर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठिशी

पुणे शहर राष्ट्रवादीचा मोठा गट शरद पवारांच्या पाठिशी आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीदेखील शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं त्यानंतर अनेक नेते आज मुंबईत गेले आहेत. कोणाचा पाठींबा कोणाला? याच्या चर्चा सुरू आहेत. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही आहे. सगळ्या नेत्यांशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट करु असं त्यांनी म्हटलं आहे. 

Maharashtra Political Crisis : आमदार अतुल बेनके संभ्रमात

पुण्यातील एका आमदारांची भूमिका अद्याप ही गुलदस्त्यात तर दोन आमदारांचे समर्थक मंत्रिपदासाठी अजित पवारांना साकडं घालत आहेत. सत्तेत जाताच अजित पवारांसमोर पेच निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके आज मुंबईतील बैठकीसाठी रवाना झालेत. मात्र शरद पवार की अजित पवार नेमके कोणाच्या बैठकीला उपस्थित राहणार?, हे त्यांनी अद्याप ही स्पष्ट केलेलं नाही. रविवारपासून ते फक्त नो कमेंट्सचं म्हणत असल्यानं त्यांची भूमिका अजून ही गुलदस्त्यात आहे. किंबहुना दोन्ही पवारांपैकी एकाला निवडणं शक्य होईना. 

Maharashtra Political Crisis : दिलीप मोहिते पाटील,अण्णा बनसोडेंचा अजित पवारांना पाठिंबा

खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहितेंनी अजित पवारांसोबत जायचं जाहीर केलेलं आहे. सहकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचे समर्थक आमच्या आमदारांना मंत्रिपद द्या, ही मागणी करण्यासाठी आजच्या बैठकी ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. तसंच काहीसं चित्र पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या बाबत आहे, त्यांना ही मंत्री करावं म्हणून त्यांचे समर्थक ही अजित पवारांना साकडं घालत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अजित पवारांना रविवारी सकाळी भेटले तेव्हा मला त्यांच्या निर्णयबद्दलल मला काहीही महित नव्हतं, माझ्या वडिलांना अंधारात ठेवलं याचं मला दुःख : सुप्रिया सुळे

[ad_2]

Related posts