कराची येथून आलेल्या 4 मुलांच्या आईच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट, ‘प्यार के चक्कर मे…’, pakistani women suspect to be spy, doubts arrested with lover in greater noida

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan Women Love Story : प्रेमात लोक आंधले असतात, असं नेहमी सांगितले जाते. प्रेमात लोक काय करतील हे सांगता येत नाही. अशीच एक फिल्मी वाटणारी ही लव्हस्टोरी आहे. आधी गेम, नंतर प्रेम आणि पाकिस्तानातील कराची येथून चार मुलांची आई चक्क भारतात विना व्हिजा पळून आली. आज लोक या प्रकरणाला ‘प्रेम की दीवानी’ असे म्हणत आहेत. दरम्यान, या लव्हस्टोरीत पोलिसांची एंट्री झाली. आता कराची येथून पळून आलेली महिला आणि तिला आसरा देणारा प्रेमी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेमात आंधळी झालेली आणि कराचीहून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा गाठलेल्या चार मुलांच्या आईच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट आलाय. व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. मात्र, आलेली महिला ही प्रेमिका नाही तर ती प्रेमकथेच्या वेशात गुप्तहेर असल्याचा संशय पोलीस आणि तपास यंत्रणांना आहे. या दिशेने तपासात काही तथ्ये समोर आली आहेत. असे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा दुजोरा देत वृत्तात म्हटले आहे की, पाकिस्तानी महिलेच्या कराची ते लखनऊ प्रवासाची केंद्रीय एजन्सीकडून चौकशी केली जात आहे. कारण भारतात आलेली ही महिला गुप्तहेर असल्याचीही शंका येते. चौकशीदरम्यान, अशी काही माहिती मिळाली आहे ती दिशेने जात आहे. बेकायदेशीरपणे राहणाऱ्या महिलेला पोलिसांनी पकडल्यावर तिच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले.

हनी ट्रॅपचा पोलिसांना संशय?

पाकिस्तानातून आलेल्या या महिलेने तिच्या कुटुंबातील काही सदस्यांचे संपर्क क्रमांक दिले. पण त्यापैकी कोणाचाही फोन येत नाही. तिने सांगितले की ती पाचवीत नापास आहे. पण तिला संगणकाचे चांगले ज्ञान आहे आणि ती अस्खलितपणे हिंदीही बोलते. पाकिस्तानी एजन्सींनी या महिलेला भारतात गुप्तहेर म्हणून पाठवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतीय तरुणाला हनी ट्रॅप करुन देशाची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी ती भारतात आलेली नाही ना?, असा संशय आहे.

कराचीतून आलेली महिला चार मुलांची आई आहे. मात्र, तिने आपले वय 27 वर्षे असल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. मी इथं राहण्यासाठी आले आहे. मी इथंच मरण पत्करेन. मात्र, पुन्हा पाकिस्तानात जाणार नाही. माझं तिथं कोणीही नाही. माझ्या पतीने वर्षभरापूर्वी मला घटस्फोट दिला आहे. मी आता  भारतात आले ते माझ्या प्रियकरावर प्रेम असल्यानेच आणि मी त्याच्याशी लग्न करु इच्छित आहे. 

असा आला प्रेमाला बहर…

ग्रेटर नोएडाचा सचिन आणि कराचीची सीमा हैदर PUBG गेम खेळताना एकमेकांच्या प्रेमात पडले. आधी त्यांची ओळख झाली नंतर ते दोघे प्रेमात पडले आणि त्यानंतर सीमाने तिच्या मुलांसह भारतात जाण्याचा निर्णय घेतला. तिला यूट्यूबच्या माध्यमातून भारतात ग्रेटन नोएडा येथे पोहोचण्याचा मार्ग सापडला.

अशी आली भारतात…

सीमा पाकिस्तानातील टिकटॉक स्टार आहे. तिने सांगितले की पती छळ करतो आणि एक वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे. सचिनला भेटल्यानंतर आणि त्याच्या प्रेमात पडल्यानंतर तिने कराचीतील आपले वडिलोपार्जित घर 12 लाख रुपयांना विकले. त्यानंतर तेच पैसे घेऊन ती दुबई आणि तेथून विमानाने नेपाळमधील काठमांडूला पोहोचली. नेपाळमधील पोखरा मार्गे रस्त्याने ग्रेटर नोएडाला पोहोचली.

तिच्याकडे या वस्तू सापडल्या…

पोलिसांनी पाकिस्तानातून आलेल्या सीमाकडून 5 मोबाईल फोन आणि 1 सिमकार्ड जप्त केले. तिच्या फोन बुकमध्ये पाकिस्तानचे अनेक संपर्क क्रमांक आहेत. फोन आणि सिमकार्ड फॉरेन्सिक टीम तपासत आहे. तिने सोबत एक सीडी देखील आणली आहे, जी 2014 मध्ये तिच्या पहिल्या लग्नाची आहे. तिच्याकडे काही कागदपत्रे सापडली असून त्यात पाकिस्तानी ओळखपत्र तसेच पासपोर्ट, कुटुंब नोंदणी प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, विमानाचे तिकीट जप्त करण्यात आले आहे.

Related posts