[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>तळेगावमधील डॉ. डी वाय पाटील महाविद्यालयातील लेडीज टॉयलेट मध्ये सीसीटीव्ही आहेत, असा आरोप झाल्यानंतर आता तिथं ख्रिश्चन समाजाची प्रार्थना का घेतली जाते, असा आरोप बजरंग दलाने केलाय. हे दोन्ही आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाण ही झालीये. या प्रकारामुळं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा अशी मागणी केली जातेय. महाविद्यालयात असा गोंधळ उडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, दुसरीकडे मावळ तहसीलदारांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिलेत. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगलं आहे. त्यामुळं लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही नेमके कोणत्या कारणासाठी बसविण्यात आले होते, हे अद्याप ही अस्पष्ट आहे.</p>
<p> </p>
[ad_2]