Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 07th July 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

1. Maharashtra NCP Crisis: “मी 82 वर्षांचा असो, वा 92 वर्षांचा…”; अजित दादांच्या प्रश्नाला थोरल्या पवारांचं प्रत्युत्तर

Maharashtra NCP Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची (BJP) कास धरत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. शिंदेंच्या बंडानंतर आधीच राज्याच्या राजकाणातील समीकरणं बदलली होती. अशातच आता अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातील समीकरणं बदलली आहेत. अशातच अजित पवारांनी एमईटी वांद्रे येथे झालेल्या बैठकीत काका शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाबोल केला होता. शरद पवारांवर अनेक आरोपही अजित पवारांनी केले. यावेळी अजित पवारांनी वय 82 वर्ष, आता तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा प्रश्नही विचारला. याला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर 

2. Rahul Gandhi Defamation Case: मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा मिळणार की, शिक्षा कायम राहणार? गुजरात उच्च न्यायालयाचा आज निर्णय

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालय (Gujarat High Court) शुक्रवारी (7 जुलै) सकाळी 11 वाजता निकाल देणार आहे. हा निर्णय न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक देणार आहेत. राहुल गांधी यांना सूरत न्यायालयानं दोषी ठरवून 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. वाचा सविस्तर 

3. Lalu Yadav on Rahul Gandhi: ज्याला बायको नाही, त्याला पंतप्रधानपदाची संधी देऊ नये; लालू प्रसाद यादव यांचा रोख नेमका कोणाकडे?

Lalu Yadav on Rahul Gandhi: सध्या भाजपविरोधात (BJP) विरोधकांनी एकीची हाक दिली आहे. आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनीही विरोधकांची साथ दिली आहे. अशातच गुरुवारी हेल्थ चेकअपसाठी लालू प्रसाद यादव पाटण्याहून दिल्लीला (Delhi News) पोहोचले. यावेळी त्यांनी 2024 मध्ये विरोधकांकडून पंतप्रधान (Prime Minister) पदासाठीचा चेहरा कोण? याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याला बायको नाही, त्याला पंतप्रधान पदाची संधी देवू नये, असं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. वाचा सविस्तर

4. Weather Update : देशात अनेक राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : देशाच्या विविध भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान  हवामान विभागानं आजही काही राज्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर गोवा आणि दक्षिण गोव्यात रेड अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर 

5. US White House Cocaine : व्हाइट हाऊसमध्ये सापडलेलं कोकेन बायडन यांच्या मुलाचं? व्हायरल व्हिडीओमुळे अनेक प्रश्न उपस्थित

US White House Cocaine : अमेरिकेच्या (America) व्हाइट हाऊसमध्ये (White House) म्हणजेच राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी अंमली पदार्थ सापडले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 2 जुलै रोजी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या वेस्ट विंगमध्ये कोकेन सापडलं होतं. या घटनेनंतर व्हाईट हाऊसमधील संबंधित परिसर रिकामा करण्यात आला आहे. व्हाईट हाऊसमध्ये सापडलेल्या कोकेन आलं कसं आणि याचा मालक नक्की कोण आहे, यासंदर्भात सध्या चौकशी सुरू आहे. वाचा सविस्तर 

6. 7th July In History: भारतातील पहिला चलचित्रपट प्रदर्शित, मुंबईत पहिली सूत गिरण सुरू, महेंद्रसिंह धोनीचा जन्म; आज इतिहासात

7th July In History: इतिहासात आजच्या दिवशी 7 जुलै रोजी झारखंडची राजधानी रांची येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आपल्या क्षमतेने आणि लढाऊ भावनेने जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळे स्थान प्राप्त केले. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्याला पद्मभूषण, पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माही या नावाने प्रसिद्ध असलेला धोनी हा तीनही आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. वाचा सविस्तर 

7. Horoscope Today 07 July 2023 : मेष, कन्या, मीन राशीच्या लोकांनी ‘या’ गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 07 July 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक आज वाहन खरेदीचा विचार करू शकतात. वेळ अतिशय शुभ आहे. कन्या राशीच्या लोकांनी आपल्या विरोधकांपासून सावध राहावे. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आजचा शुक्रवार मेष ते मीन राशीसाठी नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts