Mangal Shukra Yuti After 20 years the confluence of these two planets in the Sun zodiac sign will make a millionaire

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mangal-Shukra Yuti In Leo : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला काही प्रमुख ग्रहांचं संक्रमण होते. सध्या जुलै महिना सुरू असून या महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे. जुलैच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जुलैला मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला होता. तर आज शुक्र ग्रहाने देखील सिंह राशीत प्रवेश केलाय. 

दरम्यान यावेळी दोन ग्रहांची युती झाल्याचं दिसून येतंय. सिंह राशीत शुक्र आणि मंगळाच्या एकत्र प्रवेशामुळे दोन्ही ग्रहांची युती झालीये. सिंह राशीमध्ये हे दोन ग्रह एकत्र असल्याने याचा काही लोकांच्या जीवनावर फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कर्क रास

सिंह राशीत मंगळ आणि शुक्र प्रवेशामुळे कर्क राशीला विशेष लाभ होणार आहे. या दरम्यान कर्क राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक समृद्धी जाणवेल. अडकलेले पैसे यावेळी परत मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व वाढेल. परदेशात नोकरी मिळू शकते. 

मेष रास

मंगळ आणि शुक्राचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होणार आहे. शेअर मार्केट, सट्टेबाजी आणि लॉटरी इत्यादींमधूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळणार आहे. नोकरदार लोकांना बढती मिळू शकते.

कुंभ रास

सिंह राशीत प्रवेशामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाची युती फायदेशीर ठरणार आहे. विवाहित लोकांचं जीवन आनंदी राहणार आहे. इच्छा असल्यास तुम्ही परदेशी यात्रा देखील करू शकता. भागीदारीचं काम करणाऱ्या लोकांनाही या काळात बरेच फायदे होणार आहेत. तुम्हाला कमाईची नवीन साधन देखील मिळू शकतात. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. कोणत्या ठिकाणी थांबलेले पैसे मिळतील. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts