[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Udhav Thackeray On Narendra Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक (narendra modi) राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 1 ऑगस्टला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि याच कार्यक्रमात शरद पवारदेखील येणार आहे. एकाच मंचावर मोदी आणि शरद पवार येणार आहे. 70 हजार कोंटीच्या घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यावरुन टिका करताना म्हणाले, ‘येत्या चार-पाच दिवसात लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देण्यात येणार आहे, हे मी वर्तमानपत्रात वाचलं आहे. कोणाच्या हस्ते देण्यात येणार आहे तर शरद पवार यांच्या हस्ते. 70 हजार कोंटीच्या घोटाळ्यावरुन मोदींनी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचा नॅशनल करप्ट पार्टी म्हणून उल्लेख केला होता. आता 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं काय झालं? मला तारतम्य कळत नाही. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हा लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? कोण कोणाला विचारणार आणि याचं उत्तर कोण देणार, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर मोदी आणि शरद पवार एकत्र येणार आहेत काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात विकासाचा मुद्दा घेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले आहेत. त्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, ज्या पक्षावर 70 हजार कोंटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तोच पक्ष आता तुमच्यासोबत आला आहे. आमच्यातील काही मिंधे तुमच्यासोबत आहे. त्यात शरद पवारही असतील. मग शेवटी लोकांनी बघायचं काय? जे आरोप केले असतील त्याला जागा. आरोप करताना जबाबदारीनं वागा, असंही उद्धव ठाकरेंनी खडसावलं आहे.
पुरस्काराला कॉंग्रेसकडून विरोध
टिळक स्मारक ट्रस्टकडून देण्यात येणारा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि नेत्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पत्र पाठवून विरोध केला आहे. राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही विरोधी विचारांना विरोध करत आहेत. त्यामुळे पुरस्कार देताना विचार करा आणि रोहित टिळकांना समजावं असं अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.
1 ऑगस्टला दिग्गज एकाच मंचावर
1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे 1ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचं रोहित टिळकांनी सांगितलं. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे सत्तानाट्यानंतर पहिल्यांदात राजकीय नेत्यांची मोठी फळी या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत.
हेही वाचा
370 च्या नावावर काश्मीरमध्ये स्वप्ने विकली जात आहेत, ते आमच्या निवडणुकीच्या अजेंड्यात नाही: गुलाम नबी आझाद
[ad_2]