[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>28 जुलै ते 3 ऑगस्ट नक्षलवाद्यांचा शहीद स्मृति आठवडा असतो.. याच निमित्ताने नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीने 24 पानांचा खास डॉक्युमेंट नक्षलवाद्यांसाठी तयार केला आहे… एबीपी माझाच्या हाती लागलेल्या या खास डॉक्युमेंट मध्ये नक्षलवाद्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींना कबुली दिली आहे.. मागील एका वर्षात देशातील वेगवेगळ्या भागात 97 नक्षली कमांडर्स पोलिसांसोबत चकमकीत मारले गेले आहे, किंवा इतर कारणांनी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे नक्षली चळवळीला मोठा धक्का बसल्याचं या डॉक्युमेंट मध्ये कबूल करण्यात आलाय … गेल्या काही काळात नक्षलवादाची पीछेहाट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली ही नक्षलवाद्यांनी या डॉक्युमेंट मध्ये दिली आहे… तर येणाऱ्या दिवसांमध्ये पोलिसांच्या अत्याधुनिक डिजिटल सर्विलेंस आणि इंटेलिजन्स चा सामना कशा पद्धतीने करायचा आहे, याचा एक रोड मॅप ही आपल्या कॅडर साठी नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने मांडला आहे…</p>
[ad_2]