[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune Koyta gang : कोयता गँगचा कहर थांबेल (Pune Koyta gang) असं वाटत असतानाच चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गँगचा कहर पुन्हा एकदा दिसून आला. बारीक अंगकाठी असणाऱ्या दोन तरुणांनी फक्त 200 रुपयांसाठी थेट कोयताच काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन तरुणांनी काही व्यक्तीकडे 200 रुपयांची मागणी केली होती. मात्र त्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिल्याने थेट कोयता उगारला आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे इतका गंभीर प्रकार घडूनही चतु:शृंगी पोलिसांनी दखल घेतली नाही. या प्रकरणात कुणीही तक्रार देण्यासाठी समोर आले नाही म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला नाही आहे. त्यामुळे चतु:शृंगी पोलीस कोयत्याने वार करत एखाद्याची रस्त्यावरच खून होण्याची वाट पाहात आहेत का? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
कोयता गँगने पुणे पोलिसांना पळता भुई सोडली आहे. रोज हल्ले, केक कापणं यात धिंड काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आता DB ब्रांच आणि बिट मार्शलला पिस्तुल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सगळ्या खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असं असलं तरीही कोयता गँगला रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. या सगळ्यांना प्रशिक्षण दिल्यावर शहरातील गुन्हेगारी कमी होईल का?, कोयता गँगला आळा बसेल का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
32 पोलीस ठाण्यातील 70 ते 80 कर्मचाऱ्यांना देणार पिस्तुल
पुण्यात कोयता गँगचा कहर सुरु असतानाच मागील काही घटनांवरुन महिला सुरक्षिततेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. सदाशिव पेठेत भरदिवसा तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानंतर मात्र पुणे पोलीस खडबडून जागे झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यातील एक म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या तपास पथक आणि बिट मार्शल कर्मचाऱ्यांना पिस्तुल देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार शहरातील जवळपास 32 पोलीस ठाण्यातील 70 ते 80 कर्मचाऱ्यांना पिस्तुल देण्यात आले आहेत. हे पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आले आहे.
पुण्यातील गुन्हेगारी कधी रोखणार?
मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे पुण्यातील गुन्हेगारी कधी रोखणार?, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. त्यातच पुणे पोलीस घटनेची गंभीर दखल घेत नसल्याचंही नागरिकांकडून बोललं जात आहे.
हेही वाचा-
[ad_2]