[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Black Jamun : शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करतो. असाच एक प्रयत्न इंदापूर येथील शेतकऱ्यांनी केला असून त्यांच्या शेतात पिकवलेली जांभळाची विक्री (black jamun) आता थेट ॲमेझॉन वरून होत आहे. जांभळाला दरही चांगला मिळत असल्याने त्यांना उत्पादनही चांगले मिळत आहे. आणि ॲमेझॉनवरून विक्री होत असल्याने हा शेतकरी आता परिसरात चर्चेचा विषय बनला आहे
इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील महादेव बरळ यांची शेती ही खडकाळ जमिनीवर आहे. पूर्वी ते डाळिंबाचे उत्पादन घेत होते मात्र काही वर्षांपूर्वी गारपीटीमध्ये अनेक बागा जमीनदोस्त झाल्या. त्यातच बरळ यांची ही बाग जमीनदोस्त झाली होती. त्यातून सावरून त्यांनी कोकण येथे शेतकरी सहल गेली असता तिथून प्रेरणा घेऊन अडीच एकर जांभळाची बाग लावली. आता त्या जांभळाची विक्री अमेझोनच्या माध्यमातून होत आहे.
‘जंगली पीक असल्याने चिंताच नाही’
जांभूळ हे जंगली पीक असल्याने खडकाळ जमिनीवर जांभळाची शेती बहरली आणि जंगली पीक असल्याने यावर रोगराई ही कमी असल्याने फार कमी प्रमाणात त्यांना औषध फवारणी करावी लागत आहे. पाच वर्षानंतर जांभळाच्या प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई आणि सोलापूर या ठिकाणी जांभूळ विक्री केली त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पादनही मिळाले.
‘ॲमेझॉनवर किंमतही जास्त’
सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून याचाच फायदा घेत अमर बरळ यांनी ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीबरोबर करार करून ॲमेझॉनच्या मार्फत जांभळाची विक्री करण्यास सुरुवात केली. ॲमेझॉनवर त्यांना किलोला 200 ते 280 इतका दर मिळू लागला आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी झालेल्या मॉलमध्ये देखील त्यांचे जांभळ विक्रीला जात आहे. काही प्रमाणात जांभूळ हे पुणे सोलापूर आणि मुंबई या बाजारपेठेमध्ये देखील जात आहे.
‘सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर नफा होतोच’
बरळ यांचे कुटुंब जांभळाची तोडणी मजूर लावून करतात. तोडणी करून मालाची निवड करून जांभळ पॅकिंगमध्ये भरून ते सध्या टेंभुर्णी येथील ॲमेझॉनच्या सेंटरवर जांभूळ विक्रीसाठी पाठवत आहेत. किरकोळ बाजारपेठेमध्ये जांभळाला सध्या 70 रुपयापासून ते 150 रुपये असा किलोला दर मिळत आहे मात्र ॲमेझॉन वर जांभळाला किलोला 200 ते 280 असा दर मिळत असल्याने बरळ यांना सध्या चांगला नफा हा जांभळ विक्रीतून मिळत आहे त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. अडीच एकरात 35 हजार खर्च येतो. जांभूळ हे आयोग्यादायी पीक आहे. त्याचे अनेक फायदेदेखील आहेत. सध्याच्या काळात शेतमालाची विक्री होत असताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होते, असे चित्र आहे मात्र सोशल मीडियाचा योग्य वापर करून जर शेतमालाची विक्री केली तर मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळवता येते हे अमर बरळ यांनी दाखवून दिले आहे.
हे ही वाचा-
[ad_2]