Chandrayaan 3 Launch date why 14 July date was selected for launching yaan know reason in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrayaan 3 Launch On Friday: अंतराळ क्षेत्रात भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने (ISRO) नवनवीन विक्रम रचले आहेत. अशातच आता या इस्त्रो आठवड्यात एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रो चांद्रयान-3 लाँच (Chandrayaan 3 Launch) करण्यासाठी सज्ज आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून लाँचिगसाठी काउंटडाऊनही सुरू झाले आहे. या कामगिरीनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा चौथा देश बनेल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

इस्त्रोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चंद्रयान-3 चं प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 02:35 वाजता होणार आहे. इस्रो 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल, असं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये चांद्रयान-2 च्या आंशिक यशानंतर इस्त्रोने चांद्रयान-3 मधील प्रत्येक संभाव्य त्रुटीचा सामना करण्यासाठी 4 वर्षांत अशा चाचण्या सातत्याने घेतल्या, असंही सोमनाथ यांनी सांगितलं.

14 जुलै तारीख का निवडली?

चंद्रयान 2 चं प्रक्षेपण देखील जुलै महिन्यात करण्यात आलं होतं. त्याचं खास कारण देखील आहे. वर्षाच्या या वेळी पृथ्वी आणि त्याचा उपग्रह चंद्र एकमेकांच्या खूप जवळ असतात. चंद्रावर लँडिंग करायचं असेल, तर तिथं प्रकाश असणं गरजेचं आहे. चंद्रयान 2 सारखी चूक करणं जमणार नाही. 15 दिवस चंद्रावर प्रकाश असतो, तर 15 दिवस अंधार… चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, त्यामुळे तिथं सूर्योदय कधी होतो, वेळ काय, ठिकाण कोणतं… यानुसार प्रक्षेपणाची तारीख ठरवणं गरजेचं असतं. त्यामुळे 14 जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे.

आणखी वाचा – VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

दरम्यान, प्रोपल्शन सिस्टिममध्ये समस्या होती. त्यामुळे लँडरचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. लँडिंगदरम्यान, लँडरला सतत गती कमी करावी लागली, जेणेकरून ते चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरू शकेल. कारण वर्षाच्या यावेळी पृथ्वी आणि त्याचा उपग्रह चंद्र एकमेकांच्या खूप जवळ असतात. चंद्रयान-3 मध्ये लँडरची ऊर्जा शोषण्याची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे, त्यामुळे आता आणखी चांगल्या क्षमतेने यान उतवण्यात येणार आहे.

Related posts