Pune Crime News Shocking Minor Girl Raped By Brothers For 15 Days

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news : पुण्यात एकामागे एक राज्याला हादवणाऱ्या (Pune Crime News) घटना समोर (Rape) येत आहे. त्यातच दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीवर सलग 15 दिवस लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचार करुन मुलीला आईवडिलांना कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी दिली . या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली आहे.

 या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीसांनी नराधम इरफान शेख  आणि आयुब शेख  यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याच घटनेच्या विरोधात उद्या उरळी कांचनमध्ये बंदची हाक दिली आहे. मुलीची आई मंगळवारी (11 जुलै) रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी मुलगी अभ्यास करत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब दिसला. तर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिल्यावर खोलीत इरफान दिसला. मुलीच्या आईला पाहून दोघांनीही पळ काढला. 

आईवडिलांना कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी

आईवडिलांना कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी देऊन या मुलीवर दोघांनी 15 दिवस लैंगिक अत्याचार केला, असं मुलीने सांगितलं आहे. त्यानुसार पोलीसांनी दोघांविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. 

मुलींसोबत मुलांनाही समुपदेशनाची गरज 

या घटनेची दखल महिला आयोगाच्या अध्याक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे.  पालकांनी देखील वयात येताना आपल्या पाल्यासोबतचा संवाद वाढवून त्यांना आत्मविश्वास द्यावा ,केवळ मुलींनाच नाही तर मुलांनादेखील संवादातून समुपदेशनाची मोठी गरज आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘उरुळीकांचन येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून वारंवार तिच्यावर दोन आरोपीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे,यामध्ये पोलिस आयुक्तांशी मी स्वतः चर्चा केली असता,पीडिता व आरोपी यांची अनेक दिवसांपासून ओळख होती ,CDR मध्ये हे सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे ,आरोपीला अटक झाली असून POCSO ACT नुसार कडक कारवाई करण्यात येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

हेही वाचा-

Pune School News : एबीपी माझा इम्पॅक्ट! दोन तास बसमध्ये मुलगी अडकली; हलगर्जी वाहन चालक अन् अटेंडंटला कामावरुन काढून टाकलं…

 

 

 

 

 



[ad_2]

Related posts