Latur Coffee Shop News Police Action Against 24 Coffee Shop Oweners Marathi Crime News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Latur News: लातूर शहरातील विविध भागात असलेल्या कॉफी शॉप आणि कॅफेवर पोलिस पथकांनी छापे मारले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 24 कॅफेचालकांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने कॉफी शॉप, कॅफेचालकांचे धाबे दणाणले आहेत. 

लातूरसह जिल्ह्यातील कॉफी शॉप आणि हॉटेलबाबत पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या ठिकाणी अनेक अल्पवयीन तरुण तरुणी हे गैरकृत्य करताना आढलून आले होते. या बाबत सातत्याने ओरड होत होती. त्यानुसार लातूर पोलिसांकडून वेळोवेळी कॉफी शॉप, हॉटेलवर छापे मारण्यात आले आहेत. या कॉफी शॉपमध्ये ही आलेली ही तरुण मंडळी तासंतास बसून असत. यामुळे या ठिकाणी अनेक गैरकृत्य वाढताना दिसून येत होती. 

कॉफी शॉप चालक त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात पैसे घेऊन त्यांना येथे तयार करण्यात आलेल्या अंधाऱ्या जागेत बसू देत असत. या बाबत पोलिसांकडे सतत तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. काही नियम आणि सूचना केल्या. या सूचनेचे पालन केले पाहिजे असे बंधन घालण्यात आले होते. या बाबत सर्व कॉफी शॉप चालक यांना काही कालावधी देण्यात आला होता. या सूचनेची अमलबजावणी न करणाऱ्या कॉफी शॉप चालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात 24 कॉपी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

लातूर शहर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात अकरावी बारावी साठी राज्यभरातील विद्यार्थ्यांचा ओढा लातूरकडे असतो. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. या विद्यार्थ्यातील काही अपप्रवृत्ती असणारे तरुण-तरुणी या कॉफी शॉपकडे आपसूक वळत असतात. त्यांना या ठिकाणी नको ते चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे कृत्य हे कॉफी चालत करत असतात. त्यांना पायबंद बसावा आणि गैरकृत्य होणे थांबावं यासाठी पोलिसांनी कडक मोहीम राबवली जात आहेत.
   
शहरातील विविध पोलीस स्टेशन मधील कर्मचारी दामिनी पथक आणि विशेष पथक यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली आहे . नियमाचे पालन न करणाऱ्या 24 कॉफी शॉप चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात किंवा शहरात असे कृत्यास चालना देणारे कॉफी चालक आढळून आल्यास तात्काळ याची सूचना पोलिसांना करावी. संबधित कॉफी शॉप चालक वर कडक कारवाई करण्यात येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी व्यक्त केला आहे .

काय आहे नियमावली?

1. कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही.
2. स्वतंत्र कंपार्टमेंट करता येणार नाहीत.
3. धूम्रपणास बंदी आहे. 
4. कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य असतील.
5. सर्वांचे चेहरे नीट दिसतील अशी प्रकाश योजना आणि बैठक व्यवस्था असणे आवश्यक आहे. 

अनेक अल्पवयीन तरुण-तरुणी या कॉफी शॉपमध्ये येत असतात. इथेच त्यांना नको त्या सवयी लागतात. तरुणांमध्ये वाढणाऱ्या नशेचं कारणही हे कॉफी शॉप ठरत असल्यामुळे याबाबत जनसामान्यांमध्ये प्रचंड रोष होता. नवीन नियमावलीच्या अमलबजावणीमुळे त्याला थोडा तरी चाप बसेल यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 

ही बातमी करा: 

[ad_2]

Related posts