[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
यशस्वी उड्डाणानंतर या प्रोजेक्टचे डायरेक्टर पी वीरामुथुवेल आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ हे दोघेही भावनिक झाले. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट गेली ४ वर्ष सुरू होता त्यांना जेव्हा चांद्रयान-३ची माहिती देण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा कोणी विचार देखील केला नसेल की, उड्डाणाच्या आनंदात वीरामुथुवेल नेमक काय बोलायचे तेच विसरुन जातील.
लॉन्चर मॉड्यूल आणि चांद्रयान- ३ वेगळे झाल्यानंतर सोमनाथ यांनी देशाचे आणि सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी या प्रोजेक्टचे डायरेक्टर पी वीरामुथुवेल यांना चांद्रयान-३ची माहिती देण्यासाठी बोलवले. पण वीरामुथुवेल इतके भावूक झाले की त्यांना संपूर्ण माहिती सांगता आली नाही. यावेळी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ त्यांच्या मदतीला आले. त्यांनी वीरामुथुवेल यांना संभाळून घेतले आणि माइकवर सांगितले की आता वेळ कमी आहे. त्यामुळे या मोहिमेशी संबंधित तपशील नंतर शेअर करू. त्यानंतर दोघेही हसू लागले आणि कंट्रोल रूममधील सर्व जण दोघांच्या आनंदात सहभागी झाले.
चांद्रयान-३ने आता चंद्राकडे रवाना झाले आहे पुढील ४२ दिवसांनी ते चांद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर चंद्रापासून १०० किमी अंतरावर दक्षिण ध्रुवावर त्याचे सॉफ्ट लँडिंग करण्याची प्रक्रिया सुरु होईल. चांद्रयान-२ मध्ये लँडर विक्रम भरकटले होते. यावेळी जर भारताने यश मिळवले तर चंद्राच्या भूमीवर उतरणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा चौथा देश ठरले.
… आणि इस्रोचे प्रमुखांचा पहिला शब्द होता
यशस्वी उड्डाणानंतर देखील इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ कंट्रोल रुममधील खुर्चीवर बसून होते. जेव्हा लॉन्चर मॉड्यूल आणि चांद्रयान- ३ वेगळे झाल्याची घोषणा झाली तेव्हा सोमनाथ खुर्चीवरून एखाद्या मुला प्रमाणे पटकन उठले. सर्वजण त्यांचे अभिनंदन करू लागले. त्यानंतर ते बोलण्यासाठी आले तेव्हा त्यांचा पहिला शब्द होता अभिनंदन भारत. चांद्रयान-३ चा शानदार प्रवास सुरु झाला आहे. चांद्रयान-३ ला खुप खुप शुभेच्छा. अजून आपली मोहिम पूर्ण झालेली नाही.
[ad_2]