Why Rohit Sharma Said This After The Match About Yashasvi Jaiswal ; मी त्याच्या संयमाची परीक्षी घेतली पण… रोहित यशस्वीबद्दल सामन्यानंतर असं का म्हणाला पाहा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : यशस्वी जैस्वालने पहिलाच सामना गाजवला. पदार्पणातच त्याने शतक झळकावले आणि तो सामनावीरही ठरला. पण सामना संपल्यावर कर्णधार रोहित शर्माने यशस्वीबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यानंतर रोहित यशस्वीबाबत असं नेमकं का म्हणाला, याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.

यशस्वीबरोबर रोहित सलामीला आला होता. यशस्वीने जेव्हा शतक झळकावलं तेव्हाही रोहित त्याच्याबरोबर होता. यशस्वीची ही नेत्रदीपक खेळी तो मैदानात उभं राहून पाहत होता. त्यामुळे तो यशस्वीच्या या खेळीच्या सर्वात जवळचा होता. त्यामुळे यशस्वीकडून कोणती चांगली गोष्ट घडली आणि त्याच्याकडून नेमक्या कोणत्या चुका झाल्या हे रोहितपेक्षा जास्त कोणीही सांगू शकणार नाही. त्यामुळे जेव्हा सामना संपला तेव्हा रोहितने एक अशीच यशस्वीबाबतची गोष्ट सांगितल्याचे पाहायला मिळाले.

सामना संपल्यावर रोहित म्हणाला की, ” यशस्वीमध्ये जी गुणवत्ता आहे ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जगाने पाहिली आहे. पण यापूर्वीही मी यशस्वीची गुणवत्ता पाहिली आहे आणि त्याच्याबरोबर खेळलोही आहे. त्यामुळे त्याच्यातील प्रतिभा मला चांगलीच माहिती आहे. पण या सामन्यात त्याने गुणवत्तेबरोबर हुशारीही दाखवली आणि त्यामुळेच त्याला मोठी खेळी साकारता आली. यशस्वी जेव्हा ही खेळी साकारत होता तेव्हा त्याच्या संयमाची मी परीक्षा घेतली, पण तो घाबरला नाही. उलटपक्षी तो या परीक्षेत पास होत गेला. जेव्हा यश्सवी खेळत होता तेव्हा मी त्याला फक्त एकाच गोष्टीची आठवण करून देत होतो, मी त्याला सांगत होतो की, तु यापूर्वी फार मेहनत घेतली आहेस आणि तु या स्तरावर खेळण्यासाठी पात्र आहेस. त्यामुळे तु फक्त यापूर्वी घेतलेल्या अपार कष्टाचा विचार करत, बाकीच्या गोष्टी आपसूकच तुझ्याकडून घडत राहतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यशस्वीने त्याच्या फलंदाजीचा चांगलाच आनंद लुटला आणि त्यामुळेच त्याला ही मोठी खेळी साकारता आली.”

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

यशस्वी फलंदाजी करत असताना रोहित त्याला जवळून पाहत होता. यशस्वीच्या या खेळीने रोहितचे मन त्याने नक्कीच जिंकले आहे.

[ad_2]

Related posts