What Is Kala Treatment Which Is Management Of Physical Mental And Chronic Diseases; ‘कला’ शारीरिक, मानसिक तसेच दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनाची, कला उपचार म्हणजे नेमके काय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कला उपचार म्हणजे काय?

कला उपचार म्हणजे काय?

कला उपचार ही एक उपचारात्मक पद्धती आहे. या पद्धतीत, बरे होण्याच्या प्रक्रियेला (हीलिंग), अभिव्यक्ती आणि वैयक्तिक प्रगतीला चालना देण्यासाठी सर्जनशील प्रक्रिया व कलेचा उपयोग करण्यात येतो. मानसशास्त्र आणि कला यांची सांगड घालणाऱ्या या उपचारामुळे सर्व वयोगटांतील व्यक्तींमधील भावनिक, मानसिक व वर्तनासंबंधित असलेल्या समस्यांवर मात करण्यात मदत होते.

पेंटिंग, चित्रकला, शिल्पकला किंवा कोलाज तयार करणे आदी उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊन व्यक्ती शब्दांचा आधार न घेता व प्रतिकात्मक पद्धतीने, स्वत:च्या विचारांचा, भावनांचा आणि अनुभवांचा शोध घेऊ शकतात.

कला उपचाराच्या यंत्रणा

कला उपचाराच्या यंत्रणा

कला उपचारांची सत्रे साधारणपणे प्रशिक्षित कला उपचार तज्ज्ञांद्वारे (थेरपिस्ट) घेतली जातात. व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी सुरक्षित व अनुकूल वातावरण थेरपिस्ट निर्माण करतात. प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजा व प्राधान्यांनुसार निश्चित केलेले कलासाहित्य व तंत्रे थेरपिस्ट त्या व्यक्तीला देतात. या उपक्रमाचा भर आकर्षक कलाकुसर निर्माण करण्यावर नसतो, तर निर्मितीच्या प्रक्रियेवर तसेच या कलानिर्मितीच्या प्रयत्नात उमलणाऱ्या भावना व अंतर्दृष्टीवर असतो.

कला व मानसशास्त्र या दोन्ही विषयांवर पकड असलेल्या प्रशिक्षित व्यावसायिकांद्वारेच कला उपचार दिले जावेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हे तज्ज्ञ, व्यावसायिक नीतीमत्ताविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करतात आणि त्यांच्या क्लाएंट्सच्या हिताची तसेच त्यांचे खासगी आयुष्य गोपनीय राहील याची काळजी घेतात.

(वाचा – हात झाले असतील थुलथुलीत वाढली असेल चरबी तर, Fat Burn साठी सोपे उपाय)

कला उपचारांची परिणामकारकता

कला उपचारांची परिणामकारकता

आजार किंवा जखमा बऱ्या करण्यात तसेच कॅन्सरचे किंवा मानसिक व शारीरिक आजारांचे निदान झालेल्या रुग्णांना जाणवणारी लक्षणे कमी करण्यात सहाय्य करणे हा कला उपचारांचा मूलभूत हेतू आहे. या उपचारांची परिणामकारता वेगवेगळ्या घटकांनुसार बदलू शकते. उदाहरणार्थ, उपचारांची लक्ष्ये, क्लाएंटच्या सहभागाचा व बांधिलकीचा स्तर आणि कला उपचार करणाऱ्या थेरपिस्टचे कौशल्य.

तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांसाठी केवळ कला उपचार पुरेसा ठरू शकत नाही, तर सर्वसमावेशक उपचार योजनेचा एक भाग म्हणून किंवा अन्य उपचारपद्धतींना पूरक असा एक उपचार म्हणूनच ह्या उपचारपद्धतीचा उपयोग केला जातो, हे लक्षात घेणेही आवश्यक आहे.

(वाचा – अंगावर शहारे का येतात, काय सांगते विज्ञान आणि कारणे)

कॅन्सर आणि दीर्घकालीन आजारांसाठी कला उपचार

कॅन्सर आणि दीर्घकालीन आजारांसाठी कला उपचार

कॅन्सरचे रुग्ण तसेच मधुमेह, मूत्रपिंडांचे विकार व हृदयविकार ह्यांसारख्या दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या असलेल्या रुग्णांसाठी कला उपचार खूपच लाभदायी आहेत असे असंख्य संशोधनांतून पुढे आले आहे. कला हे अत्यंत प्रभावी साधन तसेच परिस्थितीशी सामना करण्याचे तंत्र ठरू शकते असा निष्कर्ष अनेक संशोधकांनी काढला आहे.

कित्येक कॅन्सरग्रस्तांना ‘रुग्ण’ या दर्जापलीकडील एक सकारात्मक ओळख या उपचारांमुळे मिळाली आहे. या अभ्यासांमध्ये सहभागी झालेल्यांनी पॉटरी (कुंभारकाम) आणि कार्ड्स तयार करण्यापासून चित्रकला व रंगकामापर्यंत अनेक कलाविषयक उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे.

या उपक्रमांमुळे रुग्णांना त्यांच्या आजाराहून वेगळी ओळख पुन्हा मिळवण्यात, सातत्याने चाललेल्या संघर्षातील भावनिक वेदना कमी करण्यात तसेच भविष्यकाळासाठी आशा निर्माण करण्यात मदत झाली आहे.

(वाचा – दातांचा पिवळसरपणा त्वरीत घालवून मोत्यांसारखे चमकविण्यासाठी वापरा नारळ तेल आणि हळदीचे मिश्रण)

सकारात्मक प्रयोग

सकारात्मक प्रयोग

एका स्वतंत्र अभ्यासामध्ये, मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींनी दृश्यकलेच्या विविध प्रकारांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये वस्त्रनिर्मिती, कार्ड्स तयार करणे, कोलाज, पॉटरी, जलरंगकाम आणि अ‍ॅक्रिलिक्स यांचा समावेश होता. या रुग्णांनी चार लाभ होत असल्याचे सांगितले. पहिला लाभ म्हणजे, कला उपचारांमुळे त्यांना आयुष्यातील सकारात्मक अनुभवांवर लक्ष केंद्रित करता येऊ लागले, मधुमेहाची सतत व्यापून राहिला विचार दूर करता आला.

दुसरा लाभ म्हणजे, सातत्याने संधी, आव्हाने आणि यश मिळत राहिल्याने स्वत:च्या नजरेतील त्यांची पत वाढली. तिसरा लाभ म्हणजे, समाजात त्यांच्या आजारापासून स्वतंत्र अशी ओळख राखणे त्यांना शक्य झाले. चौथा लाभ म्हणजे, या रुग्णांना, विशेषत: मधुमेहाशी निगडित सहव्याधींचा सामना करणाऱ्यांना, भावनांच्या अभिव्यक्तीसाठी वाट मिळाली.

वृद्धापकालीन काळजी

वृद्धापकालीन काळजी

कला उपचार करणाऱ्यांनी सर्व वयोगटांतील व्यक्तींसोबत काम केले आहे. यात लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले आणि प्रौढांचा समावेश होतो. या सर्व वयोगटांमध्ये नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटांसाठी कला उपचार देण्यात आले आहेत.

मानसशास्त्रीय उपचारांना (सायकोथेरपी) कला उपचारांची जोड मिळालेले रुग्ण आघाताच्या लक्षणांमधून, केवळ मानसशास्त्रीय उपचार देण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत, अधिक चांगल्या रितीने बाहेर आल्याचे संशोधनांत आढळले आहे.

फ्रण्टियर्स इन सायकोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शास्त्रशुद्ध आढाव्यामध्ये, याबाबत ठोस पुरावा देण्यात आला आहे. स्थुलत्वाच्या अवस्थेशी झगडणाऱ्या रुग्णांचे वजन कला उपचारांमुळे लक्षणीयरित्या कमी झाल्याची उदाहरणे आहेत.

तसेच अनेक मानसशास्त्रीय लक्षणांवर मात करणे कला उपचारांमुळे शक्य झाल्याचीही उदाहरणे आहेत. वयोवृद्धांना दिलेले कला उपचार त्यांच्यातील नैराश्य दूर करण्यात खूप उपयुक्त ठरल्याचे रेगेव्हने घेतलेल्या संशोधनातून पुढे आले आहे. त्याचप्रमाणे व्यक्तिगत सत्रांच्या तुलनेत समूह सत्रे खूपच प्रभावी ठरत असल्याचेही दिसून आले आहे.

मानसिक आजार व भावनिक स्वास्थ्यासाठी

मानसिक आजार व भावनिक स्वास्थ्यासाठी

मानसिक किंवा भावनिक आरोग्याशी निगडित समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी कला उपचार हे मोलाचे साधन ठरत आहे. शारीरिक, भावनिक व आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी कला उपचारांद्वारे एक सर्वांगीण दृष्टिकोन दिला जातो.

अमेरिकेतील अनेक सर्वसमावेशक मानसिक आरोग्य सेवांनी नैराश्य व चिंतेचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी तयार केल्या जाणाऱ्या उपचार योजनांमध्ये कला उपचारांचा समावेश केला आहे. मार्गदर्शनाखाली घेतल्या जाणारे कलाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या भावना विचार सर्जनशील मार्गांनी व्यक्त करण्यात प्रोत्साहन दिले जाते.

या पद्धतीची सकारात्मक निष्पत्ती दिसून आली आहे. नैराश्याची लक्षणे कमी झाल्याचा तसेच एकंदर स्वास्थ्यात सुधारणा झाल्याचा अनुभव अनेक रुग्णांनी नमूद केला आहे.

काय आहे तात्पर्य

काय आहे तात्पर्य

तात्पर्य, शारीरिक व मानसिक आजारांवरील व भावनिक स्वास्थ्यासाठीचा उपचार म्हणून कलेमधील क्षमतेला विस्तृत मान्यता आहे. पेण्टिंग, चित्रकला आणि शिल्पकलेसारखे विविध उपक्रम उपचार योजनांमध्ये समाविष्ट केल्यास रुग्णांना लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, शिथिल होण्यासाठी तसेच स्वत:ला व्यक्त करण्यासाठी वाट मिळते.

या उपचाराद्वारे रुग्ण वेदनांवर मात करण्याच्या तंत्रांमध्ये सुधारणा करू शकतात, निर्मितीतून आनंद मिळवू शकतात आणि अखेरीस त्यांचे एकंदर आरोग्य उंचावू शकतात.

[ad_2]

Related posts