”सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध…” सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Seema Haider Latest Update : पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतीय सचिन मीना (Sachin Meena) यांची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. ऑनलाइन गेमवरुन सुरु झालेले हे प्रकरण जगाचं लक्ष्य वेधून घेत आहे. पाकिस्तानी सीमा भारतातील सचिनच्या प्रेमात पडली आणि ती भारतात आली. यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येतं आहे. 

सीमा हैरद पाकिस्तानी असल्याने त्यावर अनेक संशय घेण्यात येतं आहे. सीमा ही गुप्तहेर आणि पाकिस्तानी सैन्यात अधिकारी असल्याचा आरोप तिच्यावर झाला आहे. अशात सीमाची पाकिस्तानची मैत्रिणीने मोठा खुलासा करणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  (seema haider is cheater She has relationships with many men seema pakistani friend video viral )

काय म्हणाली सीमाची मैत्रीण?

या व्हिडीओमधील महिला ही सीमा हिची बालमैत्रीण असल्याचा दावा केला आहे. सीमाची मैत्रीणने या व्हिडीओमधून ती म्हणाली आहे की,  ”सीमा नाटक करत असून ती आता जरी हिंदू झाली उद्या ख्रिश्चन व्हायलादेखील ती मागेपुढे पाहणार नाही.”  ती पुढे म्हणाली की, ”मी सीमाला लहानपणापासून ओळखते, ती फसवणूक करत आहे, असंही ती म्हणाली आहे. ” या तरुणाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

या महिलेच्या म्हणण्यानुसार ती सीमाला खूप चांगल्याप्रकारे ओळखत असून ती कटकारस्थान रचण्यात माहीर आहे. ती हिंदू आणि पाकिस्तानची फसवणूक करत असल्याचा आरोप तिने या व्हिडीओमधून केला आहे. सीमाने यापूर्वीही अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. तिचे अनेक पुरुषांनी संबंध असल्याचा दावा तिने केला आहे. 

ते असंही म्हणाली की, ”एकदा तिने भारतात क्रिकेट मॅच पाहण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. या मॅचदरम्यानही तिने नाटकं केली. ती कुठेही शांत बसणारी मुलगी नाही. ” 

दरम्यान सीमा हैदरचा पहिला नवरा गुलाम हैदरचा  (Ghulam Haider) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका मुलाखतीचा असून या मुलाखतीदरम्यान त्याने सीमाबद्दल प्रेम व्यक्त केलं असून त्याने तिला परत पाकिस्तानमध्ये येण्याची विनंती केली आहे.  

तर सचिनच्या प्रेमात सीमा चार मुलांसह पाकिस्तानातून भारतात आली आहे. ऑनलाइन गेम खेळताना तिची सचिनशी मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाखातर सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. 

Related posts