Maratha Reservation Call For Hadgaon Bandh In Nanded To Demand Maratha Reservation Main Market Is Completely Closed

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nanded News : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज नांदेड (Nanded) जिल्हयातील हदगावमध्ये बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने हदगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. मराठा क्रांती मोर्चाचे दत्ता पाटील हे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या 14 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते. दरम्यान त्यांची तब्येत खालावली असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याच्या निषेधार्थ आज हदगाव बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज बंद पाळण्यात आला, तसेच सकल मराठा समाजातर्फे हदगावमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक दत्ता पाटील यांनी आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या संवैधानिक पद्धतीने आंदोलने केली आहे. दरम्यान गेल्या 14 दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी हदगाव तालुक्यातील हडसणी येथे ते बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना प्रशासनाने नांदेडच्या कै. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविले आहे. तर सरकारने अद्याप या उपोषणाची दखल घेतली नसल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने आज (17 जुलै) रोजी निषेध म्हणून हदगांव बंद ठेवण्यात आले . यावेळी या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. 

आंदोलकांचा सरकारला इशारा…

क्रांती मोर्च्याचे समन्वयक दत्ता पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या उपोषणाची कोणतेही दखल शासनस्तरावर घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आज या विरोधात बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज हदगावमध्ये बंद पाळण्यात आला. तर तहसील कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला. तसेच पुढील 24 तासात दत्ता पाटील यांच्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही, तर पुढील आंदोलन हे सरकार आणि प्रशासनाला परवडणारे नसणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

सकाळपासून बाजारपेठेत शुकशुकाट 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दत्ता पाटील यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याचा आरोप करत हदगाव बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान या बंदला सकाळपासूनच प्रतिसाद पाहायला मिळाला. हदगावमधील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याचे पाहायला मिळाले. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापाऱ्यांनी देखील मोठ्याप्रमाणात प्रतिसाद दिला. त्यामुळे सकाळपासून बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाले. दरम्यान व्यापाऱ्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनेआभार मानण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

[ad_2]

Related posts