During Corona At The Age Of 50 He Quit Job Worth 2.5 Lakhs And Started Nursery Business Today Turnover Is In Crores Bhausaheb Navale

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nursary Success Story : वयाच्या पन्नाशीत तुम्ही नवं काय कराल? असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर…. तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला. कारण या पन्नाशीत प्रत्येक व्यक्ती स्वतःला स्थिरस्थावर ठेवण्यालाच प्राधान्य देणार. पुण्याच्या मावळमधील भाऊसाहेब नवले (Bhausaheb Navale) मात्र याला अपवाद ठरलेत. त्यांनी ऐन कोरोनात अडीच लाखांच्या पगाराची नोकरी सोडली अन नवा व्यवसाय थाटला. हा कोरोना त्यांना भलताच पावलाय, कारण आज ते वर्षाला अडीच कोटींची उलाढाल करतायेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाऊसाहेबांनी ऐन कोरोनामध्ये रिस्क घेत असा नेमका कोणता व्यवसाय सुरू केला. याबाबत सविस्तर जाणून घ्या…

अडीच लाखांची नोकरी सोडून थाटला नवा व्यवसाय

बीएससी ऍग्री झालेले भाऊसाहेब नवले यांनी वयाच्या पन्नाशीत पुण्याच्या मावळमध्ये ग्रीन ऍण्ड ब्लुम्स नर्सरी सुरू केली. आज ते वर्षाकाठी दोन कोटींची उलाढाल करत आहेत. भाऊसाहेब नवले यांनी 1995 ते 2020 अशी तब्बल 25 वर्षे नोकरी केली. त्यातील दहा वर्षे इथोपिया देशात पॉलिहाऊस मधील गुलाब उत्पादनाचा अनुभव घेतला, तिथून पुन्हा मायदेशात परतले अन इथं नर्सरीत नोकरी केली. अडीच लाख पगार ही उत्तम होता, सर्व गरजा भागत होत्याच. पण वयाची पन्नाशी गाठली अन् भाऊसाहेबांनी ऐन कोरोनातच नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. जिथं लोक नोकरी टिकवण्यासाठी लढा देत होते तिथं भाऊसाहेबांनी मंदीमध्ये संधी शोधण्यासाठी इनडोअर पॉट-प्लांटस नर्सरीचा ‘श्रीगणेशा’ केला.

ऐन कोरोनात, वयाच्या पन्नाशीत सुरु केला नवा व्यवसाय

भाऊसाहेब नवले आज वर्षाकाठी दोन कोटींची आर्थिक उलाढाल करतायेत, म्हणूनच कोरोना त्यांना पावलाच म्हणायचा. भाऊसाहेबांनी कोरोनामध्ये अर्ध्या एकरात सुरू केलेला व्यवसाय सध्या एक एकरात विस्तारलाय. या नर्सरीत ते शंभर प्रकारच्या रोपांची लागवड करतात अन देशातील तब्बल तीनशे छोट्या-मोठया नर्सरी त्यांच्याकडून रोपं खरेदी करतात. यानिमित्ताने अनेकांना रोजगार ही उपलब्ध झालाय.

आता करतायत कोट्यवधींची उलाढाल

हौसला बुलंद हो तो हर मंजिल आसान होती है… हे भाऊसाहेब नवले यांनी वयाच्या पन्नाशीत सिद्ध करून दाखवलं. तुमचं ध्येय पक्क असायला हवं, अगदी ते आधुनिक शेतीचं का असेना मग त्यात तुम्ही वयाच्या कोणत्या ही टप्प्यात यशस्वी होऊ शकता. याचा आदर्श भाऊसाहेबांनी तरुनपिढी समोर उभा केला आहे.

[ad_2]

Related posts