गळ्यातील बोरमाळेसाठी 37 वर्षीय महिलेकडून वृद्धेचा खून; 12 तासांच्या आत आरोपी गजाआड

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dapoli Crime News: वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील बोरमाळेसाठी तिचा खून केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील विसापूर येथे घडली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 37 वर्षीय सृष्टी कदम हिला अटक केली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व माहिती घेऊन तपासाची सूत्रं वेगानं हलवली. पोलिसांनी बारा तासांच्या आत आरोपी महिलेला अटक केली आहे. दीपावती घाग असं खून झालेल्या 87 वर्षाच्या महिलेचं नाव आहे. दीपावती यांची मुलं मुंबईत राहत असून त्या आपल्या दापोलीतील घरी एकट्याच राहत होत्या.

 

[ad_2]

Related posts