Pune Weather Update Less Than Expected Rainfall In Pune Only 10 TMC Water Storage From Four Dams Combined In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Weather Update : राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलाच जोर धरला असला तरीही पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या क्षेत्रांकडे पावसानं पाठ फिरवली आहे. चारही धरणांमध्ये मिळून सध्या फक्त दहा टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात या चारही धरणांमध्ये मिळून जवळपास 18 ते 19 टीएमसी पाणीसाठा होता. पण आता  ही धरणं 50 टक्केही भरलेली नाहीत. 

खडकवासला धरणक्षेत्रामध्ये रिमझिम पाऊस सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस डोंगरमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 आणि 21 जुलै घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 आणि 23 जुलै रोजी पुण्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. याच कालावधीत घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत…

राज्यभर अनेक ठिकाणी मुसळधार रा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शहरं पाण्याखालीदेखील गेली आहे. मात्र पुण्यात अजूनही हवा तेवढा पाऊस झाला नाही आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच चिंतेत पडला आहे. अनेकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे यंदा बळीराजाचं होणार?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

लोणावळ्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस कोसळला, चिंता मात्र कायम

पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग दिवशी विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या 24 तासांत इथे तब्बल 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 48 तासांत तब्बल 434 मिमी पाऊस कोसळला आहे. असं असलं तर यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊस हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2592 मिमी पाऊस बरसला होता, यंदा मात्र केवळ 1744 मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे. जी शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

राज्यात काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेन्ज अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा-

[ad_2]

Related posts