VIDEO : महाविनाशकारी ‘न्यूक्लियर बॉम्ब’ स्फोटाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nuclear Bomb Blast Viral Video : जेव्हा जेव्हा कुठल्याही दोन देशांमध्ये तणावपूर्ण आणि युद्धाची स्थिती निर्माण होते. अशावेळी संपूर्ण जगाला ज्याची सर्वात जास्त भीती वाटते ती म्हणजे अण्वस्त्र हल्ल्याची…जगातील सर्वात भयंकर अस्त्र आणि महाविनाशकारी हल्ल्यानंतर अनेक किलोमीटर जमीन आणि तिथे राहणारे लोक एकाच वेळी नष्ट होतात. 1945 मध्ये जपानमध्ये झालेल्या अणुहल्ल्याचे फोटो पाहिले की आजही अंगावर काटा येतो. (Viral News Nuclear Bomb Blast Video Trending News In  Internet google Today Viral Video)

त्यावेळी अमेरिकेने जपानच्या दोन शहरांवर अणुबॉम्बने हल्ला केला होता. या विध्वंस हल्ल्यात जवळपास 2 लाखांहून अधिक लोकांनाचा नाहक बळी गेला होता. या लोकांचा मृत्यू स्फोटामुळे लागलेल्या भीषण आग, हानिकारक रसायने आणि विषारी किरणोत्सर्गामुळे गेला होता. या अणुबॉम्बचा सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या स्फोटानंतर वातावरणात पसरणारे किरणोत्सर्गी कण. याचा परिणाम पृथ्वीवर स्फोटानंतर दीर्घकाळ राहतो. (Trending Atomic bomb Video Viral on Social media)

या हल्ल्यानंतर प्रखर उष्णता आणि किरणोत्सर्ग बाहेर पडतात त्याचा परिणाम दीर्घकाळ राहत असल्याने मानवाला ल्युकेमिया, कॅन्सरसह अनेक घातक आजार होतात. अणुबॉम्बचा भीषणचा दाखविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ अमेरिकेने 1946 मध्ये बिकिनी एटॉलवर केलेली आण्विक चाचणीचा आहे, असा दावा करण्यात आला आहे. 

शक्तिशाली आणि तेवढ्याच घातक 

निशब्द करणारा हा व्हिडीओ पाहून घाम फुटतो. समुद्राच्या आजूबाजूला निळ्या पाण्यामधील हा व्हिडीओ निसर्गाचं क्षणात सुंदर चित्र विध्वंस असं घडतं ते दाखविणारं आहे. हा स्फोट एवढा शक्तिशाली आहे की, समुद्रचा अनेक किलोमीटरचा परिसर त्याच्या कवेत आला आहे. जवळच असलेल्या बोटीच्या चिंधड्या उडून गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.  

आकाश काळ्या धुराने भरुन गेलं आहे. विचार करा ही नुसत्या चाचणीचा इतका भयंकर परिणाम दिसतं असेल तर प्रत्यक्षात मानवी वस्तीवर अणुबॉम्बचा स्फोट झाला तर काय होईल. 

हा व्हिडीओ ट्वीटरवर Insane Reality Leaks या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबतच अजून व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता.

सुमद्र किनाऱ्याचं नयनरम्य दृष्यं या स्फोटानंतर कसं विनाशकारी होतं ते यात दाखविण्यात आलं आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Dr. Zubair Iqbal Ghouri यांनी पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ virtual reality शी संबंधित असल्याचं बोलं जातं.   

 

Related posts