Get To Know More About E-Sports Online Gaming Know In Detail News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Get To Know More About E-Sports : टेक्नोलाॅजी (Technology) ने सर्व जग आता जवळ आले आहे. कोणतेही क्षेत्र असे राहिलेले नाही ज्यामध्ये टेक्नोलाॅजीचा वापर केला जात नाही. आजच्या तरुणांना तर टेक्नोलाॅजीचे अतिशय चांगले ज्ञान आहे. त्यातच आता ई-स्पोर्ट्स चे वेड मुला-मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे. अनेक गेम्स सध्या प्ले स्टोअर वर तरुणाईसाठी उपलब्ध आहेत. हे गेम्स खेळून हजारो रुपये कमवताना तरुणाई दिसते आहे. अनेक गेम्स तर असे आहेत की ज्याची अगदी क्रिकेट टूर्नामेंट सारखी टूर्नामेंट होते.

फ्री फायर , गॉड ऑफ वॉर , माईनक्राफ्ट  हे असे काही गेम्स (Games) आहेत. ज्यात क्रिकेट मॅच सारखी कंमेंटरी केली जाते. जो व्यक्ती अथवा ग्रुप जिंकेल त्याला बक्षिसे देखील दिले जातात. टूर्नामेंट्स मध्ये हे गेम्स खेळण्यासाठी संपूर्ण भारतातून तसेच जगातून तरुण-तरुणी येतात. रपराखूप नावाजलेले गेमर सध्या युट्युबवर स्वतःचे गेमिंग चॅनेल काढून अनेक गेम्स  युट्युबला लाईव्ह येऊन अतिशय मनोरंजक पद्धतीने ते खेळत असतात. नावाजलेले जे गेमर लाईव्ह येऊन खेळत असतात त्यांचे अनेक फॅन्स त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे पैसे देतात ज्यातून हजारो रुपये कमावले जातात. ग्रॅनी-३ , मिस्टर मीट , चु चु चार्ल्स या अशा काही गेम्स आहेत ज्या युट्युबला लाईव्ह येऊन मनोरंजक पद्धतीने खेळल्या जातात. तरुणांसाठी हा पैसे मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सध्या हे गेमर एवढे फेमस झाले आहेत की, त्यांना रिअॅलिटी शोमधून देखील आॅफर येतात. 

‘अरे काय ते २४ तास मोबाईल पाहत बसलेला असतो याने काय तुझे भले होणार आहे’ असे घरचे किती वेळा बोलतात. मात्र याच मोबाईल ने घरबसल्या पैसे मिळत आहेत. नऊ ते पाच जॉब पेक्षा गेम्स च्या मनोरंजक क्षेत्रात गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणं कधीही चांगलेच. मात्र व्यवस्थित समतोल ठेऊन जर गेम खेळला गेला तर गेमर म्हणून तुमचे करिअर चांगले होऊ शकते – अर्णव पाटील

मला वाटते गेम्स खेळल्याने अनेक ट्रिक तुमच्या लक्षात येऊ शकतात. क्रिएटिव्हिटी देखील वाढू शकते. किती आणि कोणत्या प्रकारने एखादी गोष्ट आपण करू शकतो हे समजते. रोजच्या धावपळीच्या जीवनात थोडा विरंगुळा म्हणून गेम्स खेळण हे योग्य आहे आणि यातून करियर होत असेल तर अजूनच उत्तम – ओंकार जाधव

[ad_2]

Related posts