Palmistry Lucky people have Shani Rekha in their hands Money rains from this age

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Rekha Prediction : ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देव यांना महत्त्वाचं स्थान आहे. मात्र ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे हस्त रेषा शास्त्रामध्येही ( Palmistry ) शनी देव यांनी खास स्थान देण्यात येतं. हस्त रेषा शास्त्रामध्ये शनि पर्वत आणि शनि रेखा ( Shani Rekha ) यांना खूप महत्त्व देण्यात आलं आहे. जरी शनि रेखा सर्व लोकांच्या हातात नाही. पण ज्यांच्या हातात ते असते, त्यांचे नशीब उजळते. 

तळहातावर कुठे असते शनी रेषा?

जी रेषा मनगटाच्या वरच्या भागापासून म्हणजेच मणिबंधापासून सुरू होऊन थेट शनिपर्वापर्यंत पोहोचते तिला शनी रेखा म्हणतात. शनी रेषेला भाग्यरेषा असंही म्हटलं जातं. ही रेषा कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट शनि पर्वतापर्यंत पोहोचली तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. ज्या व्यक्तींच्या तळहातावर अशी रेषा असते, त्याच्या आयुष्यात एका ठराविक वयानंतर पैशांची बरसात होते. 

तळहातावर धनरेषा, विवाह रेषा, जीवनरेषा या रेषाही असतात. त्याचप्रमाणे हातावर शनि रेषा असते. हस्त रेषा शास्त्रानुसार, केवळ भाग्यवान लोकांच्या हातावर ही रेषा असते. 

आयुष्यात पैशांची चणचण भासू देत नाही शनी रेषा

ज्या लोकांचा हात मनगटाच्या वरच्या भागापासून सुरू होऊन शनिरेषा किंवा भाग्य रेखापर्यंत जातो, असे लोक खूप भाग्यवान असतात. असं म्हटलं जातं की, या व्यक्ती लहान वयातच भरपूर पैसा कमावतात. तसंच या व्यक्तींना मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं.

काही लोकांच्या हातावर एक रेषा असते जी गुरु पर्वतापासून शनी पर्वतापर्यंत जाते. असं म्हटलं जातं की, अशा लोकांना खूप पैसा मिळतो. त्याचप्रमाणे हे लोक खूप मनी माइंडेड असतात. या व्यक्तींना लक्झरी लाईफ जगायला खूप आवडते.

जीवनरेषेतून बाहेर पडणारी कोणतीही रेषा शनी पर्वापर्यंत पोहोचली तर ती देखील खूप शुभ असते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात कधीही पैशांची कमी नसते. असे लोक प्रत्येक कामात सहज यशस्वी होतात. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती हस्त रेषा शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts