Systems Should Be Prepared For Disaster Management Instructions Of Pune District Collector

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune news : हवामान विभागाने (IMD) पावसाच्या संदर्भात पुणे (Pune) जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळं सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (DR Rajesh Deshmukh) यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 गावे पूरप्रवण आहेत. हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते. 

पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण

मंगळवारपासून घाटमाथ्यावरही पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे . 

 प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयस्थळ सोडू नये 

सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील नियत्रंण कक्ष कार्यान्वित असल्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालयस्थळ सोडू नये. नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा आणि वैद्यकीय उपकरणे अद्ययावत असल्याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. 

पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे

मान्सूनच्या काळात विशेषत: सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या भागातील यंत्रणांनी  सतर्क राहावे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे नदी परिसरात पूरप्रवण गावातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्याची कार्यवाही करावी. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असंही जिल्हाधिकारी  म्हणाले. मुसळधार पाऊसाच्या पार्श्वभूमीवर घाटप्रवण क्षेत्रात दरडी हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली. यावेळी सर्व संबंधित विभागप्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने तसेच आपत्तीच्या काळात करावयाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

 

[ad_2]

Related posts