Pune School Pune 355 Schools In Remote Areas To Remain Closed For Two Days After Heavy Rains

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune School : पुण्यासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे (School) नुकसान झालं आहे. त्यातच अनुचित काही घडू नये म्हणून पुण्यातील दुर्गम भागातील शाळा आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज (20 जुलै) आणि उद्या (21 जुलै) ला आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, पुरंदर, मुळशी, मावळ या तालुक्यातील अवघड क्षेत्रातील 355 शाळा आज आणि उद्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी काल रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज (गुरुवार 20 जुलै) आणि उद्या (शुक्रवार 21 जुलै) दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील. हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित आणि खाजगी शाळांना लागू आहे. इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, 

लोणावळ्यातील शाळांना उद्या सुट्टी

लोणावळ्यात आज आठ तासांतच 100 मिमी पावसाची नोंद झाली आणि काल सायंकाळ नंतर ही पावसाचा जोर कायमच होता. हे पाहता आज, उद्या शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत 434 मिमी पावसाची नोंद झाली होती. अशातच तिसऱ्या दिवशी पावसाने आणखी जोर धरला आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. उद्या पावसाची परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल.

पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण

मंगळवारपासून घाटमाथ्यावरही पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे . 

हेही वाचा-

Maharashtra Rain: आज शाळा बंद! मुसळधार पावसाची शक्यता; मुंबई, ठाण्यासह कोकणातील सर्व शाळांना सुट्टी, दहावी आणि बारावीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले

 

 

 

[ad_2]

Related posts