Radio Signals Coming To Earth From Last 35 Years From Mysterious Source Might Be Aliens; ३५ वर्षांपासून अंतराळातून रहस्यमयी सिग्नल्स, २० मिनिटांनी सगळं थांबतं, एलियन्स की…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: जेव्हापासून माणसाने अंतराळाबाबतचा अभ्यास सुरु केला आहे. तेव्हापासून तो एलियन्सचा शोध घेत आहे. पृथ्वीव्यतिरिक्तही कुठल्या ग्रहावर जीवन असू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा पृथ्वीवर एलियन्स दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आजपर्यंत हे सिद्ध होऊ शकलेलं नाही. सध्या एलियन्ससंबंधी आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे, जी गेल्या ३५ वर्षांपासून घडत आहे.

मिररच्या रिपोर्टनुसार, गेल्या तीन दशकांपासून शास्त्रज्ञांना विचित्र रेडिओ सिग्नल मिळत आहेत. जरी त्याचा स्त्रोत अद्याप माहित झालेला नसला, तरी हे सिग्नल खूप रहस्यमयी आहेत. हे सिग्नल फक्त २० मिनिटांसाठी प्राप्त होतात आणि नंतर या रेडिओ लहरी स्वतःच अदृश्य होतात. या रेडिओ लहरी १९८८ पासून शास्त्रज्ञांच्या सतत संपर्कात आहेत.

बायको-मुलांवरील प्रेमाची जादू; एक निर्णय अन् एका रात्रीत त्याने ९० कोटी जिंकले…
एलियन्स या रेडिओ लहरी पाठवत आहेत का?

सुरुवातीला, शास्त्रज्ञांनी याकडे लक्ष दिले नाही, परंतु जेव्हा रेडिओ अर्काइव्ह डेटा पाहिला तेव्हा असे समजले की फक्त एक प्रकारची रेडिओ लहर येत आहे, जी काही सेकंद आणि मिलिसेकंदांमध्ये येते आणि सुमारे २१ मिनिटे राहते. या लहरी पृथ्वीशी जोडलेल्या नाहीत आणि प्रकाशकिरणांसारख्या असतात. जेव्हा हे सिग्नल पृथ्वीवरून जातात तेव्हा ते इतका तेजस्वी आणि मजबूत असतात की ते कोणताही विक्रम मोडू शकतात. असे मानले जात आहे की ते कुठल्या ताऱ्यापासून येतात.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!


याचं कारण काय?

शास्त्रज्ञ एका मरणाऱ्या ताऱ्याचा विचार करत आहेत, ज्याचे चुंबकीय क्षेत्र खूप मोठं आहे. अशा ताऱ्यांमधूनही अशा लहरी येतात, ज्याने गेल्या ३५ वर्षांपासून शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. या विचित्र संकेतांवर संशोधन सुरू आहे. सध्या कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक यावर काम करत आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे की हा डेटा तसाच आहे की नाही किंवा त्याचा अंतराळातील कोणत्याही रहस्याशी संबंध आहे की नाही हे तर येणाऱ्या काळातच कळू शकेल.

[ad_2]

Related posts