Mumbai-based vijay kokre martyred while performing duty in jammu and kashmir

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सातारा तालुक्याच्या परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय रामचंद्र कोकरे (Jawan Vijay Kokare) हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. विजय कोकरे यांचे पार्थिव शनिवारी मुंबईत दाखल होणार आहे. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाइकांना आर्मी सेंटरकडून मिळाली आहे.

सांडवली परिसरात त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले आहेत. सैन्य दलात ते गेली चार वर्षे कार्यरत होते. जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना ते हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव गावी कधी येणार आहे, याबाबत अधिकचा तपशील मिळू शकला नाही.

सातारा तालुक्याच्या परळी भागातील सांडवली वारसवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. परळी परिसर शोकसागरात बुडाला आहे. जवान विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यांचे आई-वडीलही मुंबईतच राहतात. त्यांचे वडील मुंबईत खासगी वाहनचालक आहेत. जवान विजय कोकरे यांच्या मागे आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून वीर जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले, “सैनिकी परंपरा असलेल्या आपल्या सातारा जिल्ह्यातील परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय कोकरे हे जम्मू काश्मीर या ठिकाणी देशसेवेत कार्यरत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शालेय जीवनापासून देशसेवेत जाण्याची त्यांची जिद्द होती. २०१७ मध्ये मोठ्या कष्टाने ते स्वप्न विजय यांनी पूर्ण केले. जवान विजय यांच्यावर अतिशय लहान वयात (२६) झालेला हा आघात सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली.”


हेही वाचा



[ad_2]

Related posts