Virat Kohli Made Special Celebration After Scored Century In 500th Test Match And Video Became Viral ; विराट कोहलीने शतकानंतर केली एक खास गोष्ट, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं केलं तरी काय…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील २९ वे शतक साजरे केले. कोहलीचा हा ५०० वा सामना होता आणि त्यामध्ये शतक पूर्ण केल्यावर कोहलीने एक खास गोष्ट केल्याचे पाहायला मिळाले. कोहलीच्या या गोष्टीचा एक व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.कोहलीसाठी हा सामना महत्वाचा होता. कारण त्याचा हा ५०० वा सामना होता, तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील १०० वा कसोटी सामना. त्यामुळे या दुग्ध शर्करा योगात शतक होणं, हो कोहलीसाठी खास होतं. कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७६ वे शतक ठरले आहे. त्यामुळे तो आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक १०० शतकांच्या विश्व विक्रमाच्या जवळ जात आहे. पण कोहलीसाठी हे शतक खास होते आणि त्याने तसे सेलिब्रेशनही यावेळी केल्याचे पाहायला मिळाले.

कोहली ९७ धावावंर होता. तीन धावा शतकाला हव्या होत्या. त्यानंतर कोहलीने दमदार चौकार लगावला आणि आपले शतक दिमाखात साजरे केले. त्यामुळे कोहली १०१ धावांवर पोहोचला. कोहलीने शतक झळकावताच संघ सहकारी रवींद्र जडेजाला मिठी मारली. त्यानंतर कोहलीने हेल्मेट काढले. त्यानंतर त्याने आपली बॅट उंचावली आणि शतकाची खुण केली. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मासह अन्यय सहकाऱ्यांनी टाळ्याच्या गजरात त्याचे कौतुक केले. कारण या सामन्यातील भारताकडून हे पहिलेच शतक ठरले. रोहित शर्माला ही संधी चालून आली होती, पण तो ८० धावांवर बाद झाला. कोहलीने शतकानंतर आनंद साजरा केला आणि त्यानंतर त्याने एक खास गोष्ट केली. कोहलीने यावेळी आपल्या रिंगला किस केले. कोहलीला या आनंदाच्या क्षणी पत्नी अनुष्का शर्माची आठवण आल्यावाचून राहीली नाही. कोहलीने आपल्या गळ्यातील चैनमध्ये ही अंगठी परीधान केली आहे. शतकानंतर कोहलीने गळ्यातील चैन काढली आणि त्याने या अंगठीला किस केल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

विराट कोहलीसाठी हा सामना सोनेरी अक्षराने लिहावा असाच असेल. कारण ५०० व्या सामन्यात त्याला शतक झळकावता आले आहे.

[ad_2]

Related posts