Rozgar Mela 2023 Pm Modi To Distribute 70000 Appointment Letters To New Recruits On Saturday

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi : आज (22 जुलै) देशभरात 44 ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. केंद्र सरकारच्या विभागांबरोबरच या उपक्रमाला पाठिंबा देणारी राज्य सरकारे तसंच केंद्रशासित प्रदेश यांच्या नियुक्त्यांचा देखील यात समवेश  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज सकाळी 10.30 वाजता रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये भरती केलेल्या 70,000 पेक्षा नवीन उमेदवारांना दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे वाटणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान उमेदवारांना संबोधित देखील करणार आहेत. 

युवकांचे सक्षमीकरण करण्यावर भर

देशभरातून  निवडले गेलेले नवनियुक्त उमेदवार महसूल विभाग, आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल संसाधन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि गृह मंत्रालय, अशा विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त होतील. या सर्वांना आज नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वाधिक प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि युवकांचे सक्षमीकरण करुन त्यांना राष्ट्रीय विकासात सामिल होण्याची संधी देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

580 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम

नवनियुक्त उमेदवार iGOT कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाईन अभ्यासक्रमातून स्वतःला प्रशिक्षित करु शकतील. या पोर्टलवर 580 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, आज होणारा रोजगार मेळावा हा देशभरातील 44 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. यामध्ये केंद्र तसेच राज्य सरकारच्या विभागातील युवकांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 70000 हजार युवकांनी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Pune News : पुण्यात 1 लाख 20 हजार तरुणांना रोजगार मिळणार, 12 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; मंत्रिमंडळाचा निर्णय

[ad_2]

Related posts