Maharashtra Rain Update : राज्यात आठवडाभर सर्वदूर पावसाची शक्यता, मोसमी वाऱ्यांचा जोर आठवडाभर कायम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्रात सध्या मान्सून तीव्र स्वरूपात सक्रिय आहे. पुढील आठवडाभर राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, पुढील दोन दिवसांत ते पश्चिमेकडे सरकून जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ २४ जुलैला बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर मोसमी वाऱ्यांचा जोर आठवडाभर कायम राहणार आहे…. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. पुढचे ४८ तास कोकणासाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय…. पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आलाय…शिवाय अतिवृष्टीचीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीए.. इकडे मुंबईतही पावसाची संततधार सुरु असुन ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts