Guru Vakri 2023 Guru Vakri will walk People of this zodiac will get promotion money gain

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Guru Vakri 2023 : ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु ग्रहाला खूप महत्वाचे स्थान दिले आहे. गुरु ग्रहाला बृहस्पती देखील म्हटलं जातं. बृहस्पति हा सुख आणि सौभाग्य देणारा ग्रह मानला जातो. कुंडलीमध्ये जर गुरू शुभ स्थानात असेल तर तुम्हाला त्याचे भरपूर लाभ मिळू लागतात. कुंडलीत गुरु शुभ असेल तर व्यक्ती खूप आनंदी आणि सुखी जीवन जगते. 

12 वर्षांनंतर बृहस्पति स्वराशी मीन राशीत आहे. यावेळी आता तो वक्री चाल चालणार आहे. 4 सप्टेंबर 2023 पासून गुरु ग्रह वक्री होणार आहे. मीन राशीमध्ये गुरूची वक्री गती सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. यावेळी गुरुची ही वक्री चाल 3 राशीच्या लोकांना भरपूर लाभ देणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर गुरुच्या वक्री चालीचा फायदा होणार आहे. 

मेष रास

सप्टेंबरपासून गुरु वक्री चाल चालणार आहे. यावेळी मेष राशीच्या लोकांना याचा खूप लाभ णिळणार आहे. यावेळी या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात शुभ परिणाम मिळणार आहेत. कोणत्या ठिकाणी पैसे अडकलेले असतील तर ते मिळू शकणार आहे. जीवनात आनंद वाढेल. तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक सुखात वाढ होणार आहे. 

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना देवगुरु गुरूची वक्री चाल खूप लाभ देणार आहे. या लोकांचं उत्पन्न वाढणार आहे. इच्छित पद आणि पैसा मिळाल्याने तुम्हाला आनंद होणार आहे. आर्थिक आणि व्यावसायिक स्थिती चांगली राहणार आहे. तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतात. अविवाहितांना जोडीदार मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळणार आहे. कीर्ती वाढेल, प्रवासाला जाऊ शकता. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी देवगुरू गुरूची वक्री गती शुभ परिणाम देणार आहे देईल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. उत्पन्न वाढल्याने तुमची आर्थिक चिंता दूर होणार आहे. मिळेल. मानसिक शांती, आनंद मिळेल. कुटुंबातील जीवनातील अडचणी दूर होतील.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts