Weather Alerts : हवामानाच्या सूचना आता SMS वर येणार, जाणून घ्या नव्या सुविधेबद्दल…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Alerts SMS on mobile phones : गेल्या काही वर्षात कमी वेळात अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने प्रमाण वाढले आहे. परिणामी अनेकांची तारांबळ उडते. मात्र यावर उपाय म्हणून हवामानाचा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) मोबाइलवर SMS पाठवून खराब हवामानाबाबत अलर्ट देणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही वेळ आधीच सर्वसामान्यांना सतर्कतेचा इशारा मिळण्यास मदत होईल. यासाठी काही राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर टीव्ही आणि एफएमर रेडिओवरही दर काही तासांनी अपडेट मिळणार आहेत. 

अशी असेल नवीन सुविधा

जर तुम्ही टीव्ही पाहत असाल, तर अचानक बेक्रिंगच्या धर्तीवर खराब हवामानाचा इशारा टिव्ही टीव्ही स्क्रीनवर दिसेल. तसेच, जर तुम्ही रेडिओवर एखादे गाणे ऐकत असाल तर, गाणे मध्यभागी थांबवण्यासाठी चेतावणी सिग्नल जारी केला जाईल जेणेकरुन लोक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलू शकतील. हा जगातील सर्वात मोठा धोक्याचा इशारा देणारा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी WhatsApp, ईमेलचे सदस्यत्व घेण्याची आवश्यकता नाही. तसेच टीव्ही आणि रेडिओवर ही आपोआप गंभीर हवामान संदेश प्राप्त होण्यास मदत होईल…

नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने (NDMA) म्हटले आहे की, अतिवृष्टी, वादळ, उष्णतेच्या लाटा इत्यादींशी संबंधित हवामान सूचना मोबाईल फोनवर पाठवण्यास सुरुवात केली आहे. आता एनडीएमए या यंत्रणेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. एनडीएमएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या टप्प्यात एसएमएसद्वारे हवामानाशी संबंधित संदेश पाठवले जात आहेत. येत्या, दुसऱ्या टप्प्यात, टीव्ही आणि रेडिओवर हवामान अंदाज संबंधित सूचना मिळण्यास सुरुवात होईल. असे मानले जाते की हा उपक्रम वर्षाच्या अखेरीस सुरू होऊ शकतो.

मोबाईल मेसेजिंग सुरू होण्यापूर्वी एनडीएमए नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टल आणि मोबाइल अॅप्लिकेशन सेव्हरद्वारे हवामानाची माहिती प्राप्त झाली होती. NDMA ने ‘Common Alerting Protocol Based Integrated Alert System’ लाँच केले आहे. ज्यामध्ये हवामान विभाग, केंद्रीय जल आयोग, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया किंवा एजन्सी एकाच व्यासपीठावर आले आहेत. 2021 मध्ये, केंद्र सरकारने हा कार्यक्रम देशभरात लागू करण्यासाठी मान्यता दिली होती. 

Related posts