Pune Crime News Isis Suspects Wanted To Carry Out Bike Blast In Pune The Third Fugitive Rizwan Is The Mastermind Of The Terrorist Conspiracy

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News : पुण्यात दहशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. इम्रान खान व मोहम्मद युनीस साकी हे दोन दहशतवादी दहशतवादाच्या मॉड्युलचाच एक भाग असल्याचे समोर आले आहे. हे दोघे मॉड्युलसाठी स्लीपर सेल म्हणून ते काम करत होते. यात एक साथीदार फरार झाला असून या स्लीपर सेलचा मास्टर माईंड असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

दुचाकी चोरायचे…

हे तिघंही पुण्यात दुचाकी चोरायचे. याचमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. नंतर चौकशी केली असता ते देशविरोधी काम करत असल्याचं समोर आलं होतं. दहशतवादी कारवायांसाठी दुचाकी चोरत होते. मात्र या दुचाकी चोरुन ते कशाप्रकारे पुढचा कट रचत होते, याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोघं दहशतवादी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी राहत्या परिसरातून दुचकी चोरण्याचा प्रयत्न केला नाही. जेणेकरुन पकडले गेल्यास स्थानिक पोलिसांच्या नजरेत येणार नाही. यामुळे त्यांनी राहत्या परिसरापासून लांबचा परिसर चोरीसाठी निवडला होता. काही वर्षांपूर्वी पुण्यात चोरीच्या गाड्यांचा ब्लास्ट करण्यात आला होता. त्यांनाही दुचाकीचा ब्लास्ट करायचा होता असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. 

15 महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात लपून बसले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहेत. हे दोन दहशतवादी इसिसच्या सुफा संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे. 2022 मध्ये मार्च महिन्यात राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये याच तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त केलं होतं. बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी पावडरही जप्त करण्यात करण्यात आलं होतं. त्यांना पकडून देणाऱ्यांना पाच लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. मागील 15 महिन्यांपासून ते पुण्यातील कोंढवा परिसरात लपून बसले होते. अखेर त्यांच्यातील दोघांना जेरबंद करण्यात आलं आहे तर त्यांच्यातील एक साथीदार अजूनही फरार आहे.

NIA, ATS पथकांकडून तपास सुरु 

पुणे पोलिसांनी या दहशतवाद्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडे कसून चौकशी सुरु आहे. केंद्रातील तपास यंत्रणा ही तपासासाठी आता पुण्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान या दोघांना पकडल्यानंतर एनआयए दिल्ली, मुंबई, जयपूरची पथके आणि महाराष्ट्र एटीएसचे पथक दाखल झाले आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला आहे.

हेही वाचा-

Pandharpur News : स्मशानातील सोन्यासाठी राख चोरणारी टोळी जेरबंद करा, अन्यथा मुख्याधिकारी कार्यालयात अंत्यसंस्काराचे विधी करु; पंढरपुरात सामाजिक संघटना आक्रमक

[ad_2]

Related posts