morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 7th March 2024 india weather Indian navy politics maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Rain News : विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम, ‘या’ भागात पावसाची हजेरी

IMD Rain Alert : वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. आजही देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (IMD Rain Alert) आहे. काश्मीर खोऱ्यात आज जोरदार बर्फवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागातही आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासात देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. देशासह राज्यातही पावसाची शक्यता कायम आहे. वाचा सविस्तर…

मोठी बातमी! शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी! केसाने गळा कापू नका, राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा

Maharashtra Politics , Ratnagiri News : लोकसभेच्या जागा वाटपावरून (Lok Sabha Election 2024) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपामध्ये (BJP) वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असा इशारा शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला आहे. ‘माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा’, असं म्हणत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. वाचा सविस्तर…

Gokhale Bridge : पालिकेच्या चुकीमुळे 100 कोटींचा चुराडा! गोखले – बर्फीवाला पुलाचे सूत काही जमेना

Gokhale-Barfiwala Flyover Issue : मुंबईकरांचा वेळ वाचवणारा, वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणारा ब्रीज अर्थात अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रीज. या एका पुलामुळे वाहनचालकांचा बराच वेळ वाचतो. पण ब्रिटीशकालीन हा पूल जीर्ण झाला आणि वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला. पुलाच्या पुनर्विकासानंतर एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली. 200 कोटी खर्चून बीएमसीने नव्याने पूल बांधला खरा पण त्यातही घोळ झाला. बांधकामात चूक झाल्याने 100 कोटींचा अधिक फटका बसणार आहे. वाचा सविस्तर…

IND vs ENG : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, भारताच्या संघात दोन बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs ENG Test :  इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. वाचा सविस्तर…

गुरुवारी होणार भरभराट; ‘या’ राशींना मिळणार फायदेशीर संधी, वाचा तुमचे राशीभविष्य!

Horoscope 7th March 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर… 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts