Aurangabd Crime News Transgender Exiled For Two Years In Auranagabad Showed Fear And Collected Money

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aurangabad Crime News : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरात काही तृतीयपंथी यांच्याकडून वाहनचालकांना अडवून गुंडगिरी पद्धतीने पैसे गोळा करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सिग्नल, टोल नाका अशा ठिकाणी हे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. दरम्यान औरंगाबाद शहर पोलिसांनी याची दखल घेत एका तृतीयपंथीला थेट दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. शहरातील वेगवेगळ्या चौकात वाहनचालकांकडून पैसे गोळा करुन गुंडगिरी करणारी तृतीयपंथी सुहाना ऊर्फ गुड्डी शेख (वय 27, रा. चेतनानगर, पडेगाव) हिला सातारा पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. विशेष म्हणजे तिच्याविरुद्ध सातारा, उस्मानपुरा, छावणी, बेगमपुरा, पुंडलिकनगर आदी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुहाना ऊर्फ गुड्डीचे शहरात अनेक गट आहेत. ते सार्वजनिक रस्त्यावर चौकात एकत्र येऊन वाहनचालकांकडून आणि पायी चालणाऱ्यांकडून भिक्षेच्या स्वरुपात पैसे मागातात. सुहाना ही तर गुंड प्रवृत्तीची असून खुनशी आहे. तर तिच्यावर गुन्हेगारी वृत्तीची असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तिने सातारा, उस्मानपुरा, छावणी, बेगमपुरा आणि पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्या जोरावरच ती पैसे वसूल करायची. पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास ती लोकांना जीवे मारण्याचा धाक दाखवून पैसे मागत होती, प्रसंगी मारहाण करत होती. ती राहत असलेल्या परिसरातील लोकांमध्येही तिची दहशत होती. 

सुहाना ही गुंड प्रवृत्तीची असल्याने नागरिक तिच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. तिच्याविरुद्ध रस्ता अडवून बळजबरी पैशांची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे बेगमपुरा, छावणी, उस्मानपुरा आणि पुंडलिकनगर ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तिचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी तिला तडीपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, अंमलदार सुनील पवार यांनी तिला तडिपार आदेश बजावला,असून तिला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरातील पहिली कारवाई

शहरात गुन्हेगारी करणाऱ्या रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना आतापर्यंत पोलिसांनी तडीपार करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, पहिल्यांदाच दहशत निर्माण करणाऱ्या तृतीयपंथी आरोपीला हद्दपार केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये तृतीयपंथींचा वावर वाढलेला आहे. ते अधूनमधून बळजबरी पैसे मागतात. नवी कार, नवरदेव यांना तर अक्षरश: आडवे उभे राहून पैसे घेतात. विशेष म्हणजे थेट 500 आणि 1000 रुपयांची मागणी करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड वैतागले होते. तर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने अनेकांनी समाधान व्यक्त केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad Suicide News : ठाकरे गटातील नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन वाद; तरुणाने केली आत्महत्या

[ad_2]

Related posts