[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढून पावसाच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाल्याने काही भागात महापूर तर काही भागात पाऊस नाही असे चित्र आहे. तरी आता विदर्भ , कोकण , मराठवाडा वगैरे भागात कोसळत असलेला पाऊस थांबून दुसऱ्या भागात पावसाला सुरुवात होईल असे मत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ABP माझाशी बोलताना व्यक्त केले . त्याचसोबत, ४ ऑगस्ट रोजी चक्रीवादळ तयार होऊन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर पाऊस कोसळणार असल्याचे भाकित डख यांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या कमी वेळात जास्त पाऊस कोसळत आहे. त्यामुळेच दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचं डख यांनी सांगितलंय.
[ad_2]