Man Won 116 Crore Rupees Lottery 28 Years Ago Now He Is Selling Windows At The Age Of 61; २८ वर्षांपूर्वी ११६ कोटींची लॉटरी जिंकली, आज करतोय हे काम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: २८ वर्षांपूर्वी एका व्यक्तीने नॅशनल लॉटरीत ११ मिलियन युरो म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ११६ कोटी रुपये जिंकले. या विजयानंतर अनेक वर्षांनी तो त्याच्या दैनंदिन कामकाजी जीवनात परतला आहे. मार्क गार्डिनर (वय ६१) आणि त्यांचा व्यवसायिक भागीदार पॉल मॅडिसन यांनी १९९५ मध्ये २२ दशलक्ष युरो जिंकले होते. यामुळे दोघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मार्क यूकेचा आहे. त्याने अनेक चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले होते. त्यामुळे त्यांचे कोट्यवधी रुपये वाया गेले. तर त्यांची चौथी पत्नी ब्रेंडानेही अनेकदा चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले.

मार्कने यापैकी काही पैसे योग्य ठिकाणी गुंतवले. त्यांनी युनायटेड फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक केली. तसेच, त्यांची कंपनी क्राफ्ट ग्लासमध्येही त्यांनी २ मिलियन युरोची गुंतवणूक केली होती. आता ते ही कंपनी चालवत आहेत.

चुकूनही विकेंडला लोणावळा जाऊ नका, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील VIDEO पोस्ट करत व्यक्तीने दिला सल्ला
तो म्हणाला आहे, ‘मला चुकीचे समजू नका, पण जर मी ती लॉटरी तेव्हा न जिंकता आता वयाच्या ६१ व्या वर्षी जिंकली असती तर मी खूप वेगळ्या गोष्टी केल्या असत्या. मी काम करणं थांबवलं असतं. मी कंपनीत पैसे गुंतवायचा निर्णय घेतला होता, मला हे जाणून घ्यायचं होतं की माझ्यात कंपनीला पुढे नेण्याची क्षमता, कौशल्य आणि ज्ञान आहे की नाही. ही एक चाचणी होती आणि मी त्यात उत्तीर्ण झालो. जर मी एक दिवस सुट्टी घेतली तर मी माझ्या कर्मचार्‍यांना पगार देऊ शकणार नाही, याची मला चिंता नाही.

Gold Scheme: प्लास्टिक द्या अन् सोनं घेऊन जा… या गावची अजब स्कीम, पत्ता लिहून घ्या…
मार्क अजूनही फुटबॉल क्लबशी जुळलेले आहेत. हास्टिंग्जमध्ये त्यांचा एक स्थानिक फुटबॉल क्लब आहे. त्याने बार्बाडोसमध्ये घरही विकत घेतले आहे. त्याचे सर्व पैसे वाया गेलेले नाहीत, तर त्यांनी केलेली काही गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे.

तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

इतकंच नाही तर ते अजूनही दर आठवड्याला लॉटरी खेळतात. ते त्याच नंबरचा वापर करतात ज्यामुळे त्यांनी १९९५ मध्ये लॉटरी जिंकली होती. ते त्यांच्या जोडीदार पॉलबद्दल म्हणाले की, ते स्कॉटलंडमध्ये राहतात. पॉलने पैसे जिंकल्यानंतर काय केले हे त्यांना माहित नाही. दोघे अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही.

[ad_2]

Related posts