[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune news : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, (khadakwasla dam) पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरण प्रकल्पात आता पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची तूर्त चिंता मिटली आहे. काल सायंकाळपर्यंत 17.21 टीएमसी एतका पाणीसाठा जमा झालाय. गेल्या काही दिवसांपासून खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणात संततधार पावसाने चांगली हजेरी लावली. सध्या खडकवासला धरण हे 70 % टक्के क्षमतेने भरलंय. धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतेय. संध्याकाळी पाच वाजता नदीपात्राच विसर्ग करण्यात येणार आहे.
खडकवासला धरण आज संध्याकाळपर्यंत 100 टक्के भरले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खडकवासला धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून 1000 क्युसेकने सुरू होईल. नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि तेथे ठेवलेले प्राण्याचीदेखील काळजी घ्या. सखल भागातील लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असं प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील घाट विभागात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, ताम्हिणी घाट परिसरात गेल्या 24 तासात 230 मिमी पाऊस झाला, तर लोणावळ्यामध्ये 136 मिमी आणि शिरगावमध्ये 175 मिमी पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यासाठी 27 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 25 जुलै रोजी ‘घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता’ वर्तवण्यात आली आहे.
पुढील काही दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल?
25 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
26 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
27 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
28 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
29 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
[ad_2]