अंजू आणि नसरुल्लाहचे कथित प्री-वेंडिग शूट व्हायरल, आता तिनंच सांगितलं सत्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Anju In Pakistan: सीमा हैदरनंतर (Seema Haider)  आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची (Indian Anju) माध्यमांवर चर्चा गाजली आहे. फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी राजस्थान येथे राहणारी अंजू पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेली आहे. दरम्यान अंजू नसरुल्लाहसोबत (Anju Nasrullah) लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अंजूने यावर स्पष्टीकरण देत तिने लग्न करणार नसल्याचे म्हटलं आहे. अंजूने जरी लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी आता त्यांचे प्री वेंडिग फोटो शूट व्हायरल झाले आहे. (Anju Nasrullah Pre Wedding Video Viral)

राजस्थानात राहणारी अंजू विवाहित असून ती राजस्थानची रहिवाशी आहे. पतीसोबत खोटं बोलून  ती पाकिस्तानात मित्राला भेटण्यासाठी गेली आहे. तीन वर्षांपूर्वी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नसरुल्लाहसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यालाच भेटण्यासाठी ति भारतातून थेट पाकमध्ये पोहोचली आहे. देशात सीमा हैदर प्रकरण चर्चेत असतानाच अंजू पाकमध्ये गेल्याने विविध चर्चांना तोंड फुटले आहे. त्यातच अंजू नसरुल्लाहसोबत लग्न करणार आहे, अशी देखील चर्चा होती. 

अंजूने लग्न केल्याची चर्चा अफवा

पाकिस्तानात गेल्यानंतर अंजूने धर्म बदलला असून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तसंच, नावही बदलून फातिमा ठेवण्यात आलं आहे, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंजू लवकरच पाकिस्तानातून भारतात परत येणार आहे, असं सांगण्यात येतंयय तसंच तिने धर्मही बदलला नसल्याचे म्हटलं जातंय. 

अंजू आणि नसरुल्लाहाच्या लग्नाच्या चर्चा अफवा असल्या तरीही त्यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. हा त्यांच्या प्री वेंडिगचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानमध्येच हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे बोललं जात आहे. झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, हा व्हिडिओ मित्रांनी शूट केल्याचं तिने म्हटलं आहे. तसंच, व्लॉगरने व्ह्यूस वाढवण्यासाठी हा व्हिडिओ शूट केल्याचं तिने म्हटलं आहे. 

अंजू पाकिस्तानात कशी पोहोचली?

अंजूने वाघा बॉर्डर ओलांडत पाकिस्तानात प्रवेश केला आहे. त्यासाठी तिने काही महिने आगोदरच व्हिसाची तयारी करुन ठेवली होती. त्यानंतर तिला 4 मेरोजी पाकिस्तानाकडून 90 दिवसांसाठी व्हिसा जारी करण्यात आला होता. 21 जुलैरोजी अंजू पाकिस्तानात गेली आहे.

Related posts