Pune Crime News The Gang Fed The Pigeon Droppings To The Minor Boy For Stealing Pigeon

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News : कबुतर चोरले म्हणून टोळक्याने (Pune Crime News) हत्यार फिरवत माजवली दहशत आणि अल्पवयीन मुलाला त्याच कबुतराची विष्टा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केलं आहे. पुण्यातील कात्रज भागात घृणास्पद कृत्य समोर आलं आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे सध्या चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. 

गणेश दोडमणी, ओम पंडित, अमोल आदम या तरुणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कात्रज भागात 25 जुलै रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने आरोपींच्या जागेवरून कबुतर चोरले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यासाठी कात्रज भागात हत्यार घेऊन दहशत माजवली. 

“कोणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही”

“कोणी मध्ये आले तर एका एकाला तोडून टाकेल”, अशी धमकी देत या तरुणांनी हैदोस घातला. त्या अल्पवयीन मुलाला शोधून त्याला गाडीवर घेऊन एका ठिकाणी नेले आणि त्याला त्या ठिकाणी कबुतराची विष्टा खाऊ घातली. जर हे कोणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी या आरोपींनी त्याला दिली. घडलेला सगळा प्रकार अल्पवयीन मुलाने जेव्हा वडिलांना येऊन सांगितला तेव्हा त्यांनी पोलिसांत धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.

धिंड काढूनही दहशत कायम…

पुण्यात मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगकडून दहशत माजवली जात आहे. त्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. पोलिसांकडून या विविध टोळीला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. टोळीची धिंडही काढण्यात येते मात्र याचा काहीही परिणाम या टोळीवर होताना दिसत नाही आहे,. त्याउलट या टोळीचा धुमाकूळच वाढताना दिसत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पुण्याच्या सदाशिव पेठेत एका तरुणीवर तिच्याच मित्राकडून कोयत्यानं हल्ला करण्यात आला. त्या घटनेनं पुण्याचं पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं. आता तुम्ही हातात कोयता घ्याच, मग आम्ही तुम्हाला दाखवतो, असा सज्जड दम पोलिसांनी दिला होता मात्र तरीही दहशत कमी होताना दिसत नाही आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune News : राज्यात लवकरच पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांची आदला बदल होणार? अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार?; सुत्रांची माहिती

[ad_2]

Related posts