Shani will make Shash Raj Yoga People these zodiac signs will start a good time money will rain

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shash Mahapurush Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये सर्वात संथ गतीने परिवर्तन करणारा ग्रह शनी मानला जातो. शनी ग्रह दर अडीच वर्षानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. 30 वर्षांनंतर, शनी ग्रह सध्या कुंभ राशीत आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री राहणार असून त्यानंतर तो मार्गी होणार आहे. 

शनी मार्गीमुळे काही लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगले परिणाम मिळू शकणार आहेत. शनी मार्गी झाल्यामुळे शश राजयोगाची निर्मिती होणार आहे. यावेळी 3 राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, प्रगती होणार आहे. चला जाणून घेऊया की, मार्गी शनीमुळे तयार होणाऱ्या शश महापुरुष राजयोगाने कोणत्या राशींच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत.

शनी मार्गी ‘या’ राशींच्या व्यक्तींना देणार लाभ

वृषभ रास

शनीच्या मार्गीचालीमुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. शश राजयोग या लोकांच्या नशीबाचे दरवाजे उघडणार आहेत. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तुम्हाला उच्च पद आणि मोठा पगार मिळणार आहे. आर्थिक लाभ होऊ शकतात.

कुंभ रास

शनी देवाच्या मार्गी चालीमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींच्या दिवसाची सुरुवात उत्तम होणार आहे. शनी कुंभ राशीचा स्वामी आहे. यावेळी कुंभ राशीतील शनीची मार्गी हालचाल या राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळवून देणार आहे. आर्थिक लाभ होण्याचीही चिन्ब आहेत. भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. कुटुंबात काही अडचणी आहेत, तर त्या दूर होण्याची शक्यता आहे. 

सिंह रास

शनीच्या मार्गाने तयार झालेला शश राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जीवनात आनंद वाढणार आहे. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद येण्याची शक्यता आहे. पती-पत्नीचे नातं अधिक घट्ट होणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही खूप फायदा होईल. कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणात तुम्हाला यश मिळणार आहे.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts