Kuldeep Yadav Revealed How He Takes Four Wickets in IND vs WI 1st ODI Watch Video; काय होतं कुलदीप यादवचं प्लॅनिंग, कशा घेतल्या ४ विकेट्स? सामन्यानंतर स्वतःचं सांगितलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बार्बाडोस: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळवण्यात आला ज्यात भारताने ५ विकेट्सने सहज मिळवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात यजमान वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. विंडीज संघाने १० विकेट गमावून अवघ्या ११४ धावा केल्या. यादरम्यान भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कुलदीप यादव होता. या सामन्यातील त्याच्या घातक स्पेलबाबत सांगताना तो काय म्हणाला; जाणून घ्या.

विशेष म्हणजे, कुलदीप यादव पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी जगभरात ओळखला जातो. त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा कुलदीपकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने ३ षटकांत केवळ ६ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूत धाडले, या कामगिरीसाठी कुलदीपला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

सामन्यानंतर काय म्हणाला कुलदीप?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर कुलदीप यादव म्हणाला, “मी माझ्या या गोलंदाजीला परफेक्ट म्हणेन. आमच्या संघातील गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमार आणि हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती चमकदार होती. आम्ही इथे योग्य भागात गोलंदाजी करत होतो, जे या विकेटवर महत्त्वाचे होते.”

कुलदीप त्याच्या गोलंदाजीवर म्हणाला, “मी फक्त माझ्या रिदमवर लक्ष केंद्रित करत आहे. योग्य लेंग्थवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणामही दिसला. मला वाटत होते की ही विकेट सीम बॉलर्ससाठी चांगली असेल, पण आम्ही (कुलदीप आणि जडेजा) इथे ७ विकेट घेतल्याचा आम्हाला आनंद आहे. इथे थोडी फिरकी होती आणि थोडी उसळीही होती.”

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

[ad_2]

Related posts