[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indigo Flight Physical Harassment: दिल्लीहून (Delhi) मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये (Indigo Flight) एका महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. या प्राध्यापकावर 24 वर्षीय डॉक्टर मुलीचा विनभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण इंडिगो एअरलाईन्सच्या विमानतील आहे. आरोपी प्राध्यापक रोहित श्रीवास्तव (वयवर्षे 47) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीला न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. पण त्यानंतर त्याचा जामीन देखील मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे राहणाऱ्या रोहित श्रीवास्तव आणि त्या मुलीची सीट बाजूबाजूला होती. बुधवारी (26 जुलै) रोजी पहाटे 5.30 वाजता हे विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण विमान मुंबईत उतरण्यापूर्वीच आरोपीने मुलीचा विनभंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपीने या चुकीच्या हेतून स्पर्श केल्याचं मुलीने म्हटलं आहे.
मुलीच्या ही गोष्ट लक्षात आली असता तिने त्या व्यक्तीस विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद जास्तच वाढल्यावर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, विमानाच्या लँडिंगनंतर अधिकारी या दोघांनाही सहार पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेव्हा आरोपीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. तसेच या मुलीचा जबाबही पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
‘या’ कलमांतर्गत तक्रार दाखल
आरोपीच्या विरोधात कलम 354 आणि 354 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपीला आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सध्या आरोपीला जामीन मिळाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पंरतु अद्याप यावर इंडिगो एअरलाईन्सकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
यावर आता पोलीस प्रशासनाकडून कोणती कठोर कारवाई करण्यात येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच विमानाती महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील या कृत्यामुळे ऐरणीवर आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच यावर एअरलाईन्सकडून कोणतं स्पष्टीकरण येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune News : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाची आत्महत्या, हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं
[ad_2]