( प्रगत भारत । pragatbharat.com)
Astrology News : कर्माचा दाता किंवा न्यायदेवता शनी देव वैदिक ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा ग्रह आहे. 9 ग्रहांमधील महत्त्वाचा ग्रह हा सर्वात धिम्या गतीने आपलं स्थान बदलतो. तो एका राशीमध्ये साधारण अडीच वर्ष राहतो. न्यायदेवता शनिदेवाची जाचकाला भीती वाटते. कारण तो आपल्या कर्मानुसार फळं देतो. अशात शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. (Shani gochar these zodiac signs are going to be lucky till 2025 Astrology news)
याच वर्षांच्या सुरुवातील म्हणजे 17 जानेवारी 2023 ला शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत स्थिर झाला आहे. आता 2025 पर्यंत शनिदेवामुळे मकर, कुंभ आणि मीन राशींवर साडेसाती सुरु आहे. पण दुसरीकडे 2025 पर्यंत शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे.
‘या’ लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा
वृषभ (Taurus)
शनिदेवाची या राशीच्या लोकांवर 2025 पर्यंत विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या कुंडलीतील 10व्या शनि विराजमान आहे. त्यामुळे या राशीचं भाग्य उजळणार आहे. तुम्हाला अनेक गोष्टीतीत नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरदार वर्गासाठी हा काळ उत्तम असणार आहे. त्यांना चांगल्या चांगल्या कंपनीतून नोकरीची तगडी ऑफर मिळणार आहे. 2025 पर्यंत यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. करिअर आणि व्यवसायात या काळात प्रगती होणार आहे. व्यापारी वर्गासाठीही हा काळ लाभदायक असणार आहे.
तूळ (Libra)
या राशीबद्दल बोलायचं झालं तर शनिदेव या राशीच्या कुंडलीत पाचव्या घरात विराजमान आहे. या राशींच्या लोकांना 2025 पर्यंत अतिशय फायदा होणार आहे. मुलांच्या बाबतीत चिंता मिटणार असून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून पुढील दोन वर्ष यश आणि प्रगतीचे असणार आहे. आर्थिक दृष्ट्याही हा काळ फायदाचा असणार आहे. भौतिक सुखसोयींनी भरपूर असा हा काळ असणार आहे.
सिंह (Leo)
कुंभ राशी विराजमान असलेल्या शनिदेवामुळे सिंह राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. 2025 पर्यंत या राशीच्या कुंडलीत सातव्या घरात शनिदेव आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन 2025 पर्यंत आनंदी आनंदच असणार आहे. जोडीदाराची या काळात उत्तम साथ मिळणार आहे. प्रत्येक वेळी ती तुमच्या सोबत खंबीर पणे उभी असणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाना यश मिळणार आहे. अनेक मार्गांनी तुम्हाला या काळात आर्थिक लाभ होणार आहे.