[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
केमिकल फ्री
कार्बनिक पॅड हे साधारणतः नैसर्गिक गोष्टी अर्थात कार्बनिक कापूस अथवा अन्य वनस्पतीजन्य फायबरपासून बनविण्यात येते. यामध्ये हानिकारक केमिकल्स, प्लास्टिक, सुगंध अथवा सिंथेटिक फायबरचा वापर करण्यात येत नाही. फायबरमुळे त्वचेचे अधिक नुकसान होते. तसंच प्लास्टिक पॅड्समध्ये अधिक केमिकल्सचा वापर केला जातो. याचा अधिक काळ वापर केल्यास, त्वचेच्या समस्या उद्भवतात.
इन्फेक्शनचा धोका कमी
नियमित पॅड्सच्या वापरामुळे अनेक महिलांना खाज येणे, जळजळ होणे अथवा त्वचेवर अस्वस्थता जाणवते. ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे त्वचा अधिक रिलॅक्स राहाते आणि अलर्जीदेखील होत नाही. त्यामुळे याचा आजकाल अधिक वापर केला जातो. ज्यामध्ये महिलांना अधिक आराम मिळतो आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून दूर राहाता येतं.
(वाचा – २०६ हाडांंना मजूबती मिळण्यासाठी करा या धान्याचा नियमित वापर, रक्तदाब आणि डायबिटीसही येईल नियंत्रणात)
अधिक काळ मिळतो आराम
ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे वेंटिलेशन अधिक होते, ज्यामुळे त्वचेला श्वास घेणं सहज शक्य होतं. यामुळे बॅक्टेरिया वाढण्याची संभावना कमी होते, तसंच मासिक पाळीतील त्रास आणि संक्रमण रोखण्यासही मदत मिळते आणि महिलांना अधिक काळ आराम मिळतो, त्यातून कामाच्या ठिकाणी त्रास होत नाही आणि सतत पॅडकडे लक्ष जात नाही.
(वाचा – सकाळी उठल्यानंतर बेडवरच करा हे व्यायाम, लटकलेले पोट होईल सपाट)
बायोडिग्रेडेबल आहेत ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स
ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स हे संपूर्णतः बायोडिग्रेडेबल असतात, जे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. प्लास्टिक पॅड्सचा निचरा होत नाही मात्र ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्सचा लवकर निचरा होतो आणि पर्यावरणाला हानी पोहचत नाही. त्यामुळे महिलांमध्ये ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्सच्या वापराचे प्रमाण वाढतेय.
(वाचा – महिन्याभरात १० किलो वजन कमी करण्यासाठी किती चालणे आवश्यक, लठ्ठपणासाठी तज्ज्ञांचे अचूक गणित)
हेल्दी आणि इकॉनॉमिकल
ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स हे रेग्युलर आणि नियमित प्लास्टिक पॅड्सच्या तुलनेत अधिक फायदेशीर असतात. याच्या वापरामुळे आजार पसरण्याचा धोका राहात नाही. तसंच हे अत्यंत परवडण्यासारखे असून एकदा खरेदी केल्यानंतर अधिक काळ तुम्ही याचा वापर करू शकता.
तसंच आरोग्यसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरते असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. हायजीनच्या दृष्टीने ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्सचा चांगला परिणाम होतो. तुम्हाला रेग्युलर पॅड्समुळे रॅशेस, खाज अशा समस्या होत असतील तर याचा वापर करणे योग्य ठरेल.
[ad_2]