Pradip Kurulkar Shocking Information Out From New Chats Maharashtra News Update Marathi News Special Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pradip Kurulkar Special Report: प्रदीप कुरूलकरांचा नवा कारनामा; नव्या चॅट्समधून धक्कादायक माहिती उघड. डी आर डी ओ कडून विकसित करण्यात येत असलेल्या अग्नी ६ क्षेपणास्त्र , रुस्तुम नावाचे संरक्षक वाहन , ड्रोन कॅमेरांचा प्रकल्प आणि डी आर डी ओ कडून भारतीय सैन्यदलांसाठी विकसित केल्या जात असलेल्या इतर शस्त्रांची माहिती कुरुलकर झारा दासगुप्ताला आणि पर्यायाने पाकिस्तानला देत होता . एवढंच नाही तर भारत कोणत्या देशाबरोबर शस्त्रांस्त्रांच्या खरेदी – विक्रीचे कोणते व्यवहार करतो आहे याची माहितीही कुरुलकर झाराला देत होता . एकीकडे ही संवेदनशील माहिती दिली जात होती तर दुसरीकडे कुरुलकरने त्याच्या ह्यापी मॉर्निंग या व्हॉट्सऍपच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये झाराचा समावेश केला होता . ज्यामुळे दोघांमध्ये अगदी खाजगी संवाद होत होता. भारताच्या सीमांवर एअरफोर्स मिसाईल सिस्टीम कुठे कुठे बसवण्यात आलीयत याचीही माहिती कुरुलकरने अगदी सहजपणे झाराला दिली . कारण त्याला झाराला इम्प्रेस करायचं होतं . आपण किती महत्वाचे   शास्त्रद्न्य आहोत हे दाखवण्याच्या नादात कुरुलकर अतिशय संवेदनशील माहिती झाराला देत होता . पण पलीकडे झरा नव्हे तर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असून आपल्याला फसवलं जातंय हे शास्त्रद्न्य म्हणवणाऱ्या करुळकरांना समजत नव्हतं

[ad_2]

Related posts