Car Drowned In Nira Deoghar Dam Near Bhor-mahad Varndha Ghat 2 Died Pune Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raigad Mahad News :  पावसाळ्यामध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते. याच निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणामध्ये दाखल होतात. अशाच वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या पुण्यातील पर्यटकांवर काळाने घाला घातला. भोर-महाड येथील वरंधा घाटात शिरगाव येथे निरा देवघर धरणाच्या पाण्यात पर्यटकांची कार कोसळली. त्यात बुडून एका तरुणासह दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी तर एक जण बेपत्ता आहे.

शनिवारी ही दुर्देवी घटना घडली. मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाळ्यात कोकणातील सौंदर्यात आणखीच  भर पडली. त्याची भुरळ पर्यटकांना पडते आणि अनेक पर्यटक कोकणात दाखल होत असतात. अशाच वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी पुण्यात आयटी कंपनीत काम करणारे चौघेजण शनिवारी सकाळी मारुती बलेनो कारने फिरण्यासाठी भोर-महाड येथील वरंधा घाटात शिरगाव निरा देवघर धरणाच्या परिसरात येत होते.
 
धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार 200 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात बुडून एका दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. तर एक जण बेपत्ता आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस  आणि स्थानिकांसह बचाव कार्य सुरू केले. 

या अपघातात अक्षय रमेश धाडे (रावेत-पुणे), हर्ष प्रीत हरिसिंग बाबा राहणार (पुणे, मूळ जबलपूर मध्य प्रदेश) ही तरुणी अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. स्वप्निल परशुराम शिंदे (हडपसर-पुणे) हा बेपत्ता आहे. तर त्यांच्यासोबत असलेला संकेत वीरेश जोशी हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत जोशी हे बाणेर येथील एका आयटी कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतात. यापूर्वी संकेत जोशी, अक्षय धाडे आणि स्वप्नील शिंदे यांनी दुसऱ्या कंपनीत एकत्र काम केले होते, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. मूळची मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी असलेली हर्षप्रीत अक्षय धाडेची मैत्रीण आहे. त्यांनी सहलीला जायचे ठरवले आणि जोशींच्या घरी जमले आणि पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सहलीला निघाले. अक्षय धाडे गाडी चालवत होते. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास भोर महाड महामार्गावर वरवंड येथे वळण घेत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि नीरा-देवघर धरणाच्या मागील पाण्यात सुमारे 50 फूट खाली कोसळले. 

अपघातानंतर संकेत जोशी कारमधून बाहेर पडण्यास यशस्वी झाले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी भोर पोलिसांना माहिती दिली. लवकरच, शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि टीमने धाडे आणि हर्षप्रीतचे मृतदेह बाहेर काढले. परंतु शेवटचे वृत्त येईपर्यंत शिंदेचा शोध लागला नाही. शिंदेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

[ad_2]

Related posts