Budh Vakri 2023 Mercury will retrograde in Leo These zodiac signs will suffer financially take care of your health

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. तर दुसरीकडे ग्रह काही काळानंतर काही काळ उदय, अस्त किंवा वक्री अवस्थेत जातात. ग्रहांच्या या बदलांचा आणि स्थितीचा सर्व राशीच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. येत्या काळात बुध ग्रह वक्री स्थितीत जाणार असून त्याचा कसा परिणाम होणार आहे, ते पाहूयात.

येत्या 24 ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीमध्ये वक्री चाल चालणार आहे. याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल. पण बुधाच्या वक्रीमुळे काही राशीच्या लोकांनी सावध राहावं लागणार आहे. पाहुया कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

मेष रास

बुधाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी काही समस्या निर्माण करू शकते. यावेळी या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. यासोबतच आर्थिक स्थितीही ढासळू शकते. मोठी आर्थिक जोखीम घेणे किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सकारात्मक निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बुध ग्रहाच्या वक्री चालीमुळे न्यायालयीन प्रक्रियेतही अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना बुध वक्री झाल्यामुळे काही समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. वादविवादापासून दूर राहावे लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. बुध वक्री झाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक समस्या देखील उद्भवू शकतात. पत्नीशी वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही समस्यांना सामोरे जावे लागेल.

सिंह रास

बुध वक्री असल्यामुळे सिंह राशीच्या लोकांनीही सावध राहण्याची गरज आहे. या काळात त्याला आर्थिक क्षेत्रात खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक नुकसानासह कौटुंबिक कलह होऊ शकतो. मोठे निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करावी. कुटुंब आणि मित्रांसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात. खर्चात विशेष काळजी घ्यावी. जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts