Maharashtra News Jalna News With An Ax In Hand Union Minister Raosaheb Danve Cleaned The Lake In Jalna

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jalna News : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) पुन्हा एकदा आपल्या साधेपणामुळे चर्चेत आले आहेत. कारण रोज हिरवा झेंडा दाखवून आणि फीत कापून विविध विकास कामांचे उद्घाटन करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या हातात चक्क कुऱ्हाड पाहायला मिळाली. रविवारी दानवे यांनी हातात कुऱ्हाड घेवून थेट जालन्यातील घाणेवाडी (ता.जालना) येथील संत गाडगेबाबा जलाशय गाठले. तर जलाशयाच्या भिंतीवरील काटेरी झुडपे कुऱ्हाडीने तोडली. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून काम सुरू असून, त्यानिमित्ताने श्रमदान मोहिमेत रविवारी दानवे यांनी सहभाग नोंदवून श्रमदान करत सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या भिंतीवर मागील काही दिवसांत गवत, काटेरी झुडपे वाढले आहेत. तर जलाशयाच्या परिसरात प्लास्टिक कचरा देखील मोठ्याप्रमाणावर जमा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्याचा निर्णय जालनाकरांनी घेतला. त्यामुळे यासाठी प्रत्येक रविवारी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवली जाते. या मोहिमेत शहरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहून तलावाच्या भिंतीवर सामूहिक श्रमदान करतात. 

दरम्यान, याच स्वच्छता मोहीमेत रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सहभाग नोंदवला आहे. यावेळी दानवे यांनी हातात कुऱ्हाड घेऊन तलाव परिसरात असलेल्या काटेरी झुडपे कुऱ्हाडीने तोडली. एखाद्या सर्वसामन्य शेतकऱ्यांप्रमाणे हातात कुऱ्हाड घेऊन काटेरी झुडपे तोडताना दानवे यांना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर केंद्रीय मंत्री असताना देखील दानवे श्रमदान मोहिमेत दाखल झाल्याने पुन्हा एकदा त्यांचा साधेपणा पाहायला मिळाला असून, याची जोरदार चर्चा देखील पाहायला मिळत आहे. 

जालन्यातून नवीन पॅटर्न तयार झालाय

याबाबत बोलताना दानवे म्हणाले की, काम कोणतेही असो त्यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असतो. लोकसहभागातून नदीपात्रातील कचरा प्लास्टिक काढण्यासह सार्वजनिक स्वच्छता, वृक्षारोपण, श्रमदान अभियान हे जालन्यातून नवीन पॅटर्न तयार झालाय. तर लोकसहभागातून शासन यंत्रणा देखील जागृत होते. तसेच यावेळी घाणेवाडी जलाशयाच्या सांडव्याची तात्काळ दुरूस्ती करणे, तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या सूचनाही देखील दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

इतर महत्वाच्या बातम्या : 

कोकणवासियांच्या आरक्षित तिकिटांवर डल्ला कोण मारतंय? राजू पाटलांचा परखड सवाल, राज्य रेल्वेमंत्री दानवेंना पत्र

[ad_2]

Related posts