14 construction workers dead in thane after grinder machine collapses on samruddhi expressway

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच जण जखमी आहेत.

आतापर्यत 15 ते 20 मजुरांचा मृत्यू झालाय. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांवर कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15 मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) दुर्घटना आणि अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि त्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेतून सावरत नाही तोच पुन्हा समृद्धी महामार्गावर शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली. 

[ad_2]

Related posts